शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मोदी विचारांची शेती करा

By admin | Updated: October 2, 2014 23:33 IST

योगेंद्र गोडे यांची प्रचार सभा : देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन.

बुलडाणा : काँग्रेसच्या राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी, महागाई वाढली त्यामुळे आता येणार्‍या काळात राजकारणाच्या शेतात वाढलेले काँग्रेस राष्ट्रवादीचे तण फेकून द्या व मोदी विचारांची शेती करा असे आवाहन करीत योगेंद्र गोडे यांच्या पाठीशी राहून परिवर्तनाचे शिलेदार व्हावा अशी हाक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दवेंद्र फडणवीस यांनी दिली.बुलडाणा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार योगेंद्र गोडे यांच्या प्रचारासाठी आयोजीत सभेत ते बोलत हो ते अध्यक्षस्थानी आमदार डॉ.रणजीत पाटील हे होते तर मंचावर योगेंद्र गोडे यांचे सह गोकुल शर्मा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, जगदेवराव बाहेकर, अँड. व्ही. डी. पाटील, एकनाथ खर्चे, विजया राठी, वैशाली डाबेराव, दत्ता खरात, दत्ता पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात योगेंद्र गोडे यांनी बुलडाण्यात मेडीकल कॉलेज उभारण्याची केलेली मागणी तात्काळ मान्य करीत भाजपाची सत्ता आल्यास प्रत्येक जिल्ह्यात एक मेडीकल कॉलेज देऊ अशी घोषणा केली. व्ही.डी.पाटील यांनी पक्षाचा आदेश माननारा मी कार्यकर्ता आहे अशाच आदेशाचे आपण पालन करून गोडे यांच्या पाठीशी रहा असे आवाहन केले. योगेंद्रने घेतलेली आघाडी कायम ठेवाभाजपाने बुलडाण्यात तरूण, तडफदार व सुशिक्षीत असा उमेदवार योगेंद्र गोडे यांच्या रूपाने दिला आहे. गोडे यांनी पक्षाचे काम तात्काळ हाती घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. ही आघाडी अशीच कायम ठेवा व राज्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी गोडे यांना विजयी करा असे भावनिक आवाहन फडणवीस यांनी प्रचार सभेत केले.