शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे न.प. समोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:46 IST

चिखली : शहरात विशेष रस्ता निधी, दलित वस्ती निधी तसेच  नगरोत्थान योजनेंतर्गत होत असलेल्या  रस्ते व नाल्याची कामे  तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या  शौचालयाची कामे निकृष्ट दर्जाची होत असताना याबाबत  वारंवार निवेदने देऊनही पालिका प्रशासन हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष  करीत असल्याचा आरोप करीत बांधकाम विभागातील  भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, या  मागणीसाठी मनसेच्यावतीने नगर पालिकेसमोर २५ सप्टेंबर रोजी  ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शहरात विशेष रस्ता निधी, दलित वस्ती निधी तसेच  नगरोत्थान योजनेंतर्गत होत असलेल्या  रस्ते व नाल्याची कामे  तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या  शौचालयाची कामे निकृष्ट दर्जाची होत असताना याबाबत  वारंवार निवेदने देऊनही पालिका प्रशासन हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष  करीत असल्याचा आरोप करीत बांधकाम विभागातील  भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, या  मागणीसाठी मनसेच्यावतीने नगर पालिकेसमोर २५ सप्टेंबर रोजी  ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.शहरात होत असलेल्या रस्ते, नाल्या व शौचालयांसह इतर सर्व  कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून, सदर कामे निविदे प्रमाणे व कामाच्या इस्टीमेटनुसार होत नसल्याचा आरोप मनसेने  केला आहे. तसेच या कामामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत  असल्याने या कामांची व बांधकाम विभागात होत असलेल्या  भ्रष्टाचाराची समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी  जिल्हाधिकार्‍यांकडे गत ११ ऑगस्ट २0१७ रोजी केली होती;  मात्र या निवेदनाला जिल्हा प्रशासनाने केराची टोपली दा खविल्याने जिल्हा प्रशासन बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकारी  व ठेकेदार यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत  मनसेच्यावतीने या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करावी, या  मागणीसाठी २५ सप्टेंबर रोजी नगर परिषद कार्यालयासमोर  जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष गणेश  बरबडे,  तालुकाध्यक्ष विनोद खरपास,  राजेश परिहार यांच्या नेतृ त्वात हे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जिल्हा  प्रशासनासह पालिका प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजीदेखील  करण्यात आली. यावेळी रवी वानखेडे, राधेश्याम कुलकर्णी,  गजानन दांडगे, अजय देशमाने,  सिद्धू रिन्ढे, बाळु नेवरे, बाबा  खान, अंकुश सुसर, समाधान म्हस्के, अमोल गादे, दीपक  देशमुख, वैभव देहाडराय, विशाल इंगळे, मोहन मेहेत्ने, किशोर  लोखंडे, गणेश मानतकर,  विकास राऊत, दीपक वानखेडे,  मंगेश उगले, विजय इंगळे, गणेश राऊत,  दीपक बरबडे  यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, येत्या १0  दिवसांत चौकशी समिती स्थापन न  झाल्यास तीव्र आंदोलन  छेडण्याचा इशारा यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांनी  प्रशासनास दिला.