शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्याचे नामकरण करून मनसेने केले अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

मेहकर- शेगांव-पंढरपूर पालखी मार्गाला काहीच दिवसात लोणार फाट्याजवळ खड्डे पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या नवीन खड्ड्यांचे नामकरण करत ...

मेहकर- शेगांव-पंढरपूर पालखी मार्गाला काहीच दिवसात लोणार फाट्याजवळ खड्डे पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या नवीन खड्ड्यांचे नामकरण करत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व संबंधित ठेकेदाराचा निषेध नोंदवत शनिवारी अनोखे आंदोलन केले़

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनात शेगांव-पंढरपूर पालखी मार्गाचे काम किती निकृष्ट झाल्याचा आराेप मनसेने केला आहे़ तसेच कुंभकर्णी झोपेत असलेल्या एमएसआरडीसी व ठेकेदाराला जागे करण्यासाठी या खड्ड्यांचे नामकरण कवट्या महाकाळ असे करून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी संबंधित विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ या वेळी मनसे तालुका प्रमुख संतोष अंभोरे, शहर अध्यक्ष सुधीर रायते, तालुका उपाध्यक्ष शत्रुघ्न चेके, विजय वायाळ, मनोज खंदारे,राम आड़े, तालुका संघटक अंकित पाटिल, मनविसे तालुका प्रमुख राहुल बोड़खे,मनविसे शहर अध्यक्ष आदिनाथ सुरुशे,स्वप्नील दुधाट,गणेश रास्कर सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.