आरडव (जि. बुलडाणा): आमदार आदर्श ग्राम दत्तक योजनेंतर्गत मेहकर विधानसभा मतदारसंघातील लोणार तालुक्यातील दाभा गाव विकासासाठी दत्तक घेतल्यामुळे मुंबई-कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी १0 ऑक्टोबर रोजी दाभा गावाची पाहणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका शिवसेना प्रमुख प्रा. बळीराम मापारी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार मंगेश कुडाळकर, ओमप्रकाश यादव, नंदकिशोर मापारी, सभापती माधवराव जाधव, माजी सभापती सुनील सुलताने, संतोष मापारी, तेजराव घायाळ, भगवान सुलताने, दशरथ जायभाये, पांडुरंग सरकटे, गोपाल तोष्णीवाल, अशोक वारे, साहेबराव मोर उपस्थित होते.
आमदारांनी केली दाभा गावाची पाहणी
By admin | Updated: October 12, 2015 01:15 IST