शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

गौण खनिजमाफियांचे धाबे दणाणले

By admin | Updated: June 28, 2014 01:43 IST

मेहकर व सिंदखेड राजा तालुक्यात महसुल विभागाची कारवाई.

मेहकर : महसूल विभागाच्यावतीने गौण खनिज तस्करांवर गत दोन महिन्यामध्ये ३६ वाहनधारकांवर कारवाई करुन २ लाख १ हजार ६00 रुपये वसूल करण्यात आले आहेत. महसूल विभागाने गौण खनिज तस्करांविरुद्ध कारवाईचा सपाटासुरू केल्याने अवैध गौण खनिज वाहतुकदारांचे धाबे दणाणले आहेत. मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यातून एकमेव पैनगंगा आणि खडकपुर्णा नदी वाहते. या नदीमध्ये पाच ते २५ फुट खोल रेतीसाठा आहे. परंतू, महसुल खात्याच्या काही अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे अवैध गौण खनिज उत्खननाला तालुक्यात पेव फुटले आहे. महसूल विभाग गौण खनिज तस्करांवर आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, तहसीलदार निर्भय जैन यांच्यासह सहकार्‍यांनी गौण खनिज माफीयांवर पाळत ठेऊन गत दोन महिन्यात ३६ वाहन धारकावर कारवाई केली आहे. महसुल विभागाच्यावतीने ९ मे ते २५ जून दरम्यान अवैध रेती वाहतूक करणार्‍या १७ वाहनांवर कारवाई करुन १ लाख १0 हजार ४00 रुपये दंड वसुल केला आहे. तसेच अवैध माती वाहतूक करणार्‍यांकडून २७ हजार ५00, अवैध मुरुम वाहतूक करणार्‍यांकडून ५७ हजार ३00, अवैध गिट्टी वाहतूक करणार्‍यांकडून ३ हजार २00 व डब्बर वाहतूक करणार्‍यांकडून ३ हजार २00 रुपये दंड वसुल केला आहे. अशाप्रकारे दोन महिन्यात अवैध गौण खनिज माफीयांकडून २ लाख १ हजार ६00 रुपये गोळा करण्यात आले आहेत. ९ मे ते २५ जून दरम्यान मेहकर, फैजलापूर, हिवराआश्रम, जानेफळ, पांगरखेड, अंजनी बु., उकळी, सोनाटी या परिसरात मोठय़ा प्रमाणात गौण खनिज माफीयांवर कारवाई करण्यात आली. *नियमाला मूठमातीदिवसाच्या सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेव्यतिरीक्त नदीपात्रात दोन मिटर पेक्षा जास्त वाळू उपसा करण्यास मनाई असतांनाही, तसे न होता येथे सर्रास नियमाला मुठमाती दिल्या जात आहे. रेतीची वाहतूक करतांना वाळू झाकून नेणे बंधनकारक असतांना कोणीही हे नियम पाळत नाहीत. तसेच नियमबाह्य अधिक प्रमाणात रात्रीच्या वेळीच रेतीची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत आहे.