खामगाव : स्थानिक पुरवार गल्लीतील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी राणा गेटजवळील रहिवासी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुरवार गल्लीतील १३ वर्षीय मुलगी ही बुधवारी रात्री ७ वा. दरम्यान फरशीकडे येत असताना राणा गेटजवळील रहिवासी रवि ठोसर (वय २0) या युवकाने सदर मुलीस टॉन्टींग करून दुचाकीवर बसण्याचा इशारा केला. घाबरलेल्या मुलीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनात जावून युवकाविरुद्ध तक्रार दिली. यावरून पोलिसांनी रवि ठोसर विरुद्ध कलम ५0९ आयपीसी, सहकलम १२ (बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा) नुसार गुन्हा दाखल करून त्यास तातडीने अटक केली. पुढील तपास एपीआय बनसोडे हे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीची छेड काढणा-यास अटक
By admin | Updated: October 9, 2015 01:53 IST