शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठय़ात अत्यल्प वाढ!

By admin | Updated: September 13, 2016 02:49 IST

खामगाव तालुकातील धरणांची स्थिती महिनाभरापासून पावसाची दडी; तोरणा प्रकल्पात घट.

खामगाव (जि. बुलडाणा), दि. १२ : यावर्षी सुरुवातीला दमदार सुरुवात झालेल्या पावसाने ऑगस्टपासून दडी मारली. त्यामुळे तालुक्यातील मध्यम आणि लघू प्रकल्पात जलसाठय़ात समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. गत महिन्यातील अन् आजचा प्रकल्पातील जलसाठा यामध्ये किंचित वाढ झाल्याचे दिसून येते. दमदार पावसाअभावी जलसाठय़ातील अपेक्षित वाढ थांबली आहे.खामगाव तालुक्यात मन, तोरणा, ज्ञानगंगा, मस व ढोरपगाव हे मध्यम प्रकल्प तर बोरजवळा, गारडगाव, टाकळी, पिंप्री गवळी व लांजुड लघू प्रकल्प आहेत. मागील तीन वर्षात पावसाची सरासरी कमी झाल्याने धरणातील जलसाठा अपेक्षित वाढलाच नाही. खरिपाच्या पिकांना अत्यल्प पावसाचा फटका तर रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी नाही, अशा विदारक परिस्थितीत शेतकरी अडकला. यामुळे शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडले. यावर्षी सुरुवातीपासून पावसाळा समाधानकारक राहिला. पेरणी करून बसलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी चांगले उत्पन्न निघण्याची आशा होती; मात्र ऐन पिके बहरण्याच्या वेळेस पावसाने दडी मारली. या दडीचा परिणाम शेतीबरोबर धरणातील जलसाठय़ाला बसला आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात व ऑगस्ट सुरुवातीला दमदार पाऊस झाल्याने जलसाठय़ात वाढ दिसून आली. १३ ऑगस्ट रोजी मन प्रकल्पात ६३.६२ टक्के (२३.४३ दलघमी) जलसाठा होता. यामध्ये महिन्यानंतर सद्यस्थितीत केवळ ३ टक्के जलसाठा वाढला आहे. सध्याचा जलसाठा ६६.९८ टक्के (२४.६६ दलघमी) आहे. तोरणा प्रकल्पाने तर ५0 टक्केही पाणी पातळी ओलांडली नाही. सद्यस्थितीत तोरणामध्ये ३७.९१ टक्के (२.९९ दलघमी) जलसाठा आहे. महिनाभरापूर्वी हा जलसाठा ३८.४३ टक्के (३.0३ दलघमी) होता. ढोरपगाव प्रकल्पात ८३.५२ टक्के (४.९४ दलघमी) जलसाठा होता. यामध्ये सध्या ८६.९९ टक्के (५.0८ दलघमी) जलसाठा आहे. खामगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ज्ञानगंगा प्रकल्प परिसरात यावर्षी सर्वाधिक कमी पावसाची नोंद आहे. ज्ञानगंगा परिसरात आतापर्यंत २५0 मि.मी. पावसाची नोंद असून, धरणात ४३.८६ टक्के (१४.८८ दलघमी) जलसाठा आहे. महिनाभरापूर्वी ही नोंद ४१.८२ टक्के (१४.१९ दलघमी) एवढी होती. तालुक्यातील मस हा प्रकल्प १00 टक्के भरलेला आहे. ओव्हरफ्लो झालेल्या या प्रकल्पातून १३ ऑगस्ट रोजी ५ सेंमी पाण्याचा विसर्ग सुरू होता. यातील जलसाठा १00 टक्के कायम आहे. लघू प्रकल्प बोरजवळामध्ये ५६.१0 टक्के जलसाठा आहे, तर गारडगाव ८९.७६ टक्के, टाकळी ८७.८६ टक्के, लांजुड ७४.२२ टक्के तर पिंप्री गवळीमध्ये १00 टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पातील वाढ न होता थांबलेला जलसाठा चिंतेचा विषय बनला आहे. सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस होऊन धरणाच्या पाणीपातळीत १00 टक्के वाढ होण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.