या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान होते. कार्यक्रमाला सिद्धेश्वर पवार, रफिक कुरेशी, नारायण पचेरवाल, संतोष मलोसे, ठेकेदार रामेश्वर पीटकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम कार्यक्रमाचे आयोजक तथा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. नंतर सर्व नियमांचे पालन करत सर्व उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दूध आणि पुष्प टाकून अभिषेक केला व त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनसेचे तालुका प्रमुख संतोष अंभोरे, शहर प्रमुख सुधीर रायते, तालुका उपप्रमुख शत्रुघ्न चेके, गोविंद शर्मा, सुदाम मानघाले, भरत चेके, राहुल बोडखे, अंकित पाटील, मनोज खंदारे, राम आडे, पुरुषोत्तम शिरसाठ, शंकर जाधव, गणेश पऱ्हाड, राजिक बागवान, अविनाश बचाटे, संतोष वाघ, अमोल जाधव, मदन मुंदडा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोज शाह यांनी केले. आभार लक्ष्मण जाधव यांनी मानले. यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:05 IST