शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

मध्यान्ह भोजनात पहिल्या दिवशी मिळणार गोडधोड

By admin | Updated: June 24, 2015 02:00 IST

प्रवेशोत्सव तयारी ; नवागतांचे होणार स्वागत.

सिद्धार्थ आराख / खामगाव : येत्या २६ जूनला विदर्भातील सर्व शाळा सुरू होत असून, शाळांमध्ये प्रवेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शाळांचा परिसर विद्यार्थ्यांनी फुलून जाणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या मध्यान्ह भोजनात शाळेच्या पहिल्या दिवसाच्या मेन्यूमध्ये गोड पदार्थ देण्यात येणार आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यासाठी नवागतांसह शिक्षकही सज्ज झाले आहेत. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर २६ जून शुक्रवारपासून विदर्भातील शालेय सत्राला प्रारंभ होत आहे. यात सर्व शाळांनी तसेच विद्यालयांनी नवागतांचे स्वागत वाजत-गाजत करावे आणि प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवावा, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. मागील दोन वर्षांंपासून राज्यभरातील काही शाळा अशा प्रकरचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करतात. काही शाळा तर चक्क ढोलताशांच्या गजरात मुलांचे स्वागत करतात. यावर्षीसुद्धा मुलांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश दिल्यामुळे बहुतांश शाळांमध्ये साफसफाईची कामे सुरू झाली आहेत. अनेक शाळांमध्ये उत्साही शिक्षक शाळेची सजावट करून शालेय परिसर प्रसन्न करतात. नव्या कामाचा शुभारंभ करताना गोडधोड वाटपाची परंपरा आहे. ही परंपरा शाळेतसुद्धा अंगीकारण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या मध्यान्ह भोजनातील जेवणात गोड पदार्थाचा समावेश करण्यात येणार आहे; मात्र मेन्यूतील हा बदल किती शाळांत दिसेल, हासुद्धा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या १२00 आणि खासगी शाळांना स्वागतोत्सव कार्यक्रम साजरा करीत विद्यार्थ्यांंची १00 टक्के पटनोंदणी करण्याच्या सूचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आले आहे. स्वागतोत्सवासाठी त्यातील पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांचे सहकार्य घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.