शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील भूखंडांचे दर वाढले!

By admin | Updated: February 19, 2016 01:43 IST

पाच तालुक्यांत क्षेत्र नाही; बुलडाणा व संग्रामपुरात नाममात्र वाढ, सहा तालुक्यांमध्ये दुप्पट दर.

नीलेश शहाकार/बुलडाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडांचे दर वाढविण्यात आले आहेत. चार वर्षानंतर ही दरवाढ करण्यात आली आहे. औद्योगिक व वाणिज्यीक भूखंडांचे बहुतांश दर हे दुप्पट करण्यात आले आहेत. बुलडाणा व संग्रामपूर येथील औद्योगिक क्षेत्र भूखंडात नाममात्र वाढ असून, इतर तालुक्यांमध्ये दर दुपटीने वाढविण्यात आले आहेत.जिल्ह्यात बुलडाणा, मलकापूर, मेहकर, संग्रामपूर, लोणार, देऊळगावराजा, खामगाव आणि चिखली येथे एमआयडीसी आहे. या आठ औद्योगिक क्षेत्रांमध्ये एकूण ६६५.७८ हेक्टर जागा उद्योगांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. उद्योगांसाठी ही जमीन महामंडळाच्या ताब्यात असली तरी या क्षेत्रात एकूण ९९३ विकसित भूखंडांपैकी ७५३ भूखंडांचे वाटप विविध उद्योगघटकांना करण्यात आले. या वाटप केलेल्या भूखंडांपैकी २८७ भूखंडांवर उत्पादन प्रक्रिया सुरू आहे; मात्र आजही ३६६ भूखंडांवर कोणताही उद्योग, व्यवसाय संबंधित मालकाने उभारला नाही. उद्योजकांनी बरेच वर्षाआधी अवघ्या चार ते पाच रुपये प्रति चौरस फूट दराने उद्योगाच्या नावाखाली भूखंड घेतले; परंतु गेल्या कित्येक वर्षांंपासून हे भूखंड पडून असून, प्रत्यक्षात उद्योग सुरू केलेला नाही. त्यानंतरही एमआयडीसीने हे भूखंड परत घेण्याची तसदी घेतली नाही, हे विशेष. एमआयडीसीने सन २0१२ मध्ये भूखंडांची दरवाढ केली होती. त्या चार वर्षांंनंतर आता ही दरवाढ केली गेली आहे. बुलडाणा औद्योगिक भूखंड ४0 रुपये चौरस मीटर दराने दिले गेले होते. त्याचे दर आता ६५ रुपये प्रति चौरस मीटर करण्यात आले आहे. वाणिज्यिक भूखंडाचे दर ८0 रुपयांवरून १३0 रुपये करण्यात आले आहेत. अन्य एमआयडीसीतील औद्योगिक व वाणिज्यिक भूखंडाचे दर दुपटीने वाढविले गेले, तर यवतमाळ एमआयडीसीत नाममात्र २५ ते ५0 रुपयांची दरवाढ केली गेल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.