शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचन योजनेचे अनुदान थकले

By admin | Updated: November 22, 2015 02:45 IST

बुलडाणा जिल्हय़ातील २८१७६ शेतक-यांचे ८८ कोटींचे अनुदान दोन वर्षांंपासून प्रलंबित.

सुधीर चेके पाटील / चिखली (बुलडाणा) : विदर्भातील शेतकर्‍यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्र म सुरू करण्यात आला आहे; मात्र या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना ठिबक व तुषार संच खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान गत दोन वर्षांंपासून कृषी विभागाच्या नियोजनशून्य कारभार व लालफीतशाहीत अडकले असून, जिल्हय़ातील २८ हजार १७६ शेतकर्‍यांचे एकूण ८७ कोटी ८१ लाख रुपये शासनाकडे थकले आहेत. यामध्ये चिखली तालुक्यातील ३ हजार ३७१ लाभार्थी शेतकर्‍यांचे ५ कोटी ४२ लाख ६९ हजार रुपयांचे अनुदान थकले असल्याने सलग चार वष्रे दुष्काळ, त्यात कर्ज काढून या योजनेचा लाभ घेतला असल्याने सद्य:स्थितीत लाभार्थी शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. विदर्भात सलग दुसर्‍यांदा पावसाचा खंड पडला असून, पिकांना संरक्षित ओलीत करण्यासाठी, ठिबक, तुषार संचाची गरज आहे; परंतु हे संच खरेदी करण्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतीमध्ये ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करता यावा, यासाठी केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बुलडाणा जिल्हय़ातील २८ हजार १८६ लाभार्थी शेतकर्‍यांचे सन २0१३-१४ व २0१४-१५ या दोन वर्षाची एकूण ८७ कोटी ८१ लाख एवढी प्रचंड अनुदानाची रक्कम कृषी विभागाकडे थकीत आहे. यामध्ये चिखली तालुक्यात सन २0१३-१४ मध्ये ठिबकचे ४६ शेतकर्‍यांचे १६ लाख २७ हजार, तर स्प्रिंकलरच्या १ हजार ७५ शेतकर्‍यांचे १ कोटी ४६ लाख २0 हजार रुपये आणि सन २0१४-१५ मध्ये ठिबकच्या २४0 शेतकर्‍यांचे ७८ लाख ७२ हजार तर स्प्रिंकलरच्या २ हजार १0 शेतकर्‍यांचे ३ कोटी १ लाख ५0 हजार रुपये असे एकूण ३ हजार ३७१ शेतकर्‍यांचे ५ कोटी ४२ लाख ६९ हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागाकडे रखडले आहे. शेतीला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने अनुदानावर ठिबक व तुषार सिंचन संच पुरविण्यास सुरुवात केली. अनुदानावर संच उपलब्ध होऊन शेतीला पाण्याची व्यवस्था होत असल्याने जिल्हय़ातील हजारो शेतकर्‍यांनी कृषी खात्याकडे प्रस्ताव सादर केले. सुरुवातीला अनुदान वाटण्यातही आले; परंतु आता शासनानेच यासाठी हात आखडता घेतला आहे.