शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
2
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
3
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
4
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
5
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
6
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
7
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
9
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
10
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
12
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
13
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
14
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
15
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
16
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
17
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
18
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
19
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
20
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद

बाप्पांना निरोप

By admin | Updated: September 9, 2014 19:17 IST

मिरवणूक हर्षाेल्हासात : मिरवणुकीत मुलींचाही सहभाग

बुलडाणा : दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह आज विसर्जन मिरवणुकीत जिल्हाभर दिसून येत होता. टाळ-मृदंगाच्या गजराला ढोल ताशांची जोड, डी.जे., लेझीम पथक, मल्लखांबाच्या कसरती, तलवारबाजीपासून तर चित्तथरारक मैदानी खेळांचे प्रदर्शन अशा उत्साही वातावरणात आज बाप्पाला निरोप देण्यात आला. बाप्पा ! पुढच्या वषी लवकर या.. असा आग्रह धरीत आबालवृद्ध आज बाप्पाला निरोप देताना भावविभोर झाले होते. गणेश विसर्जनासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक शामराव दिघावकर, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. वृत्त लिहेपर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडला नव्हता. बाप्पांची विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात सुरू होती. खामगाव येथे सकाळी तर बुलडाणा, मोताळा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, साखरखेर्डा, शेगाव, चिखली, लोणार येथे मिरवणूक उशिरा सुरू झाली, तर मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस येत असल्यामुळे बुलडाण्यात मिरवणुकीत संथपणा आला होता. गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सकाळपासूनच जिल्हाभरात प्रारंभ झाला. सर्वाधिक गणेश मंडळ असलेल्या खामगावात सकाळी १0 वाजता मानाच्या लाकडी गणपतीची पूजा होऊन मिरवणुकला प्रारंभ झाला. बुलडाण्यात दुपारी ३ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. संध्याकाळी पावसाने उघडीप दिल्याने मिरवणुकीत भाविक-भक्तांनी जल्लोष भरला. त्यामुळे जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, जनता चौक, कारंजा चौक, स्टेट बँक चौक परिसरातून निघणार्‍या मिरवणुकीने रस्ता दणाणूक सोडला होता. तर घरघुती गणेशाचे विसर्जन अजिंठा रस्त्यावरील सरकारी तलावात करण्यात आले. चिखलीमध्ये संध्याकाळी तर मेहकरमध्येही दुपारीच मिरवणूक सुरू झाली. लोणार येथील मिरवणुकींमध्ये ढोलताशांसह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चित्तथराराक कसरतींचे प्रदर्शन केले. यावर्षी विहिरी व तलावांना भरपूर पाणी असल्यामुळे विसर्जनाचा प्रश्न भक्तांसमोर भेडसावला नाही. घरगुती गणेश मूर्तींचे गावतलाव तसेच विहिरींमध्ये विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. पावसाचा रंग पाहता गणेश मंडळांनी मूर्ती ओली होऊ नये म्हणून प्लॉस्टिकचे संरक्षण लावले होते. तर प्रत्येक तलावावर स्थानिक नगरपालिकेने निर्माल्य जमा करण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती.

** खामगाव : श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत केवळ युवकच नव्हे, तर शहरातील मुलीही हिरिरीने सहभागी झाल्याचे दिसून आले. मल्लखांब, फुगडी, लेजीम यासारख्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह उत्कृष्ट झांज वाजवून आपण युवकांच्या तुलनेत तसूभरही कमी नसल्याचे दाखवून दिले. शहरातील श्री तानाजी व हनुमान गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत मुलींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. गेल्या वर्षीपासून विसर्जन मिरवणुकीत मुलीही सहभागी होत आहेत. ही परंपरा यावर्षीही कायम राहिली. विसर्जन मिरवणूक मार्गावरील विविध चौकात या मंडळांच्या मुलींनी झांज व लेजीम पथकाच्या माध्यमातून भाविकांना मंत्रमुग्ध केले. मुलींचे हे लेजीम पथक व झांज पथक विसर्जन मिरवणुकीतील एक आकर्षण ठरले. वाढलेली संख्यासुद्धा लक्षणीय होती.