शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास जाणा-या १७० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: शासनाने स्वच्छ भारत मिशन युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना केल्याने मेहकर नगरपालिकेचे गुडमॉर्निंग पथक शहरात सक्रिय झाले असून, मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसणाºया जवळपास १७० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उघड्यावर शौचास बसणाºयांना न.प.च्या भरारी पथकाचा चाप बसत आहे.आपले घर, परिसर व ...

ठळक मुद्देमेहकर नगरपालिकेचे गुड मॉर्निंग पथक सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: शासनाने स्वच्छ भारत मिशन युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना केल्याने मेहकर नगरपालिकेचे गुडमॉर्निंग पथक शहरात सक्रिय झाले असून, मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसणाºया जवळपास १७० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उघड्यावर शौचास बसणाºयांना न.प.च्या भरारी पथकाचा चाप बसत आहे.आपले घर, परिसर व शहर स्वच्छ राहून नागरिकांचे आरोग्यसुद्धा निरोगी व सुदृढ राहावे, यासाठी शौचालयाचे बांधकाम करून त्याचा नियमित वापर करावा, तसेच उघड्यावर कोणीही शौचास बसू नये, अशा शासनाच्या सक्त सूचना आहेत. तर नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून वेळप्रसंगी गुन्हासुद्धा दाखल करण्यात येत आहे. मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन नियोजनबद्ध पद्धतीने व युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. यासाठी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृतीसुद्धा करण्यात आली. तर आता गुडमार्निंग पथकाचे ४ भरारी पथक नेमून अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली रतन शिरपूरकर, संतोष राणे, सुधीर सारोळकर, पवन भादुपोता, पाठक प्रमुख आदींच्या समावेश आहे.हे भरारी पथक सकाळी ५ वाजतापासून दिवसभर व रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या परिसरात फिरून उघड्यावर शौचास बसणाºया व नियमांचे उल्लंघन करून अस्वच्छता करणाºयांवर दंडात्मक कारवाइ करीत आहे.आतापर्यंत १७० जणांवर कारवाई करण्यात आली असून, स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहकार्य करून आपलाच परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन मुख्याधिकारी अशोक सातपुते यांनी यावेळी केले.उघड्यावर शौचास बसणा-याला गुलाबपुष्पमेहकर पंचायत समितीच्यावतीने गटविकास अधिकारी आर.पी. पवार, अशोक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात गुडमार्निंग पथक राबवून उघड्यावर शौचास बसणाºयावर कारवाई करण्यात येत आहे. यावेळी बरटाळा, चिंचोली बोरे, दादुलगव्हाण या गावांना भेटी देऊन उघड्यावर शौचास बसणाºयाला गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने त्यांचे स्वागत करून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी स्वच्छता अभियानामध्ये दत्तात्रय मगर, ग्रामसेवक भगवान काळे, कैलास वानखेडे, एम.आर. पाटील, सरंपच अरुण दळवी, गजानन सावंत, सुमंता बोरे आदी सहभागी झाले आहेत.