शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मेहकर तालुक्याची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:56 IST

मेहकर : भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत फेब्रुवारी अखेरपर्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्त करावयाचा आहे. त्यादृष्टीने आतापर्यंत मेहकर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत हगणदरीमुक्त झाल्या आहेत, तर ५६ ग्रामपंचायतींचे शौचालय बांधकाम प्रगतिपथावर आहे. फेब्रुवारी  अखेरपर्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्तीकडे वाटचाल करीत आहे.

ठळक मुद्दे४२ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त ५६ ग्रामपंचायतींमधील कामेही अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत फेब्रुवारी अखेरपर्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्त करावयाचा आहे. त्यादृष्टीने आतापर्यंत मेहकर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत हगणदरीमुक्त झाल्या आहेत, तर ५६ ग्रामपंचायतींचे शौचालय बांधकाम प्रगतिपथावर आहे. फेब्रुवारी  अखेरपर्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्तीकडे वाटचाल करीत आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण मेहकर तालुका हगणदरीमुक्त झाला पाहिजे, यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.पी. पवार, सहायक गटविकास अधिकारी अशोक सानप, सभापती जया खंडारे, उपसभापती राजू घनवट, गटसमन्वयक दत्तात्रय मगर, यांनी गेल्या अनेक दिवसांपासून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये शौचालय बांधकाम व त्याचा वापर करणे, यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. कलापथक, गुडमॉर्निंग पथक, स्वच्छता रॅली, समाजप्रबोधन, ग्रामसभा, गृहभेटी, कॉर्नर बैठका या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधले पाहिजे, यासाठी सक्तीसुद्धा करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे शौचालय नसेल, अशा कुटुंबाला रेशनचे अन्नधान्य, निळे रॉकेल, कोणताही दाखला व शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ देण्यात येणार नाही, अशा सूचनासुद्धा सर्वांना देण्यात आल्या आहेत.  काही वेळेस  वरिष्ठ अधिकार्‍यांचे दौरेसुद्धा  आयोजित करण्यात आले होते. सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक शिक्षकवर्ग, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, यांनी गावा-गावांत जाऊन प्रत्येक कुटुंबाला भेटी देऊन शौचालय बांधकामासंदर्भात जनजागृती करावी, अशा सूचनासुद्धा पंचायत समिती स्तरावरून देण्यात आल्या होत्या. या सर्वांच्या परिश्रमाला यश येत असून, जवळपास ८२ टक्के शौचालय बांधकाम पूर्ण झाले असून, १८ टक्के बांधकाम बाकी आहे. २८  फेब्रुवारी रोजी मेहकर तालुका हगणदरीमुक्त झाला पाहिजे, यादृष्टीने मेहकर पंचायत समितीची  यशस्वी वाटचाल सुरू आहे.-

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMehkar Bypassमेहकर बायपास