शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर विभागाचा प्रस्ताव ऐरणीवर!

By admin | Updated: February 8, 2016 02:23 IST

महावितरण प्रशासकीय व नागरी सुविधेसाठी विभाजन गरजेचे आहे.

गिरीश राऊत / खामगाव: प्रशासकीय कामकाज आणि नागरी सुविधांच्या दृष्टीने महावितरण कंपनीच्या खामगाव येथील उपविभागीय कार्यालयाचे विभाजन करून मेहकर हा स्वतंत्र विभाग करण्यासंदर्भातील प्रस्ताव महावितरणच्या मुख्य कार्यालयात एक वर्षापासून प्रलंबित आहे. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी आकोट येथील विभागास मंजुरी देण्यात आल्याने मेहकर विभागाचा प्रश्नही सध्या ऐरणीवर आला आहे. प्रशासकीय सुविधा आणि नागरी सेवा देताना कामाचा दर्जा अधिकतम असावा, या दृष्टिकोणातून हा प्रस्ताव उपयुक्त असून, त्या दृष्टीने आता हालचाल होण्याची गरज निर्माण झाली आहे. मेहकर विभागाचा प्रस्ताव हा आकोट कार्यालयाच्या आधीचा असल्याने त्याबाबत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नाही म्हणायला प्रशासकीय सुविधेच्या दृष्टिकोणातून अनेक कार्यालयांचे विभाजन होत असते तसे हे व्हावे, ही अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महावितरणच्या खामगाव येथील उपविभागीय कार्यालयांतर्गत खामगाव शहर, खामगाव ग्रामीण, शेगाव, संग्रामपूर, मेहकर व लोणार असे सहा विभाग कार्यरत आहेत; मात्र भौगोलिकदृष्ट्या विचार करता मेहकर व लोणार हे दोन्ही तालुके काहीसे अडचणीचे ठरतात. या भागाचे कार्यालय खामगाव येथे असल्याने कार्यालयीन बैठकी व इतर कामकाज यासाठी शाखा अभियंत्यासोबतच इतर कर्मचारी, सोबतच तक्रारी, नवीन मीटर जोडणी व इतर संबंधित कामकाजानिमित्त खामगाव येथे यावे लागते तसेच नवीन रोहित्र बसविणे, वीजवाहिनी साहित्य ने-आण करणे आदी कामे करावी लागतात. यासाठी खामगाव परिसरातील शेगाव, संग्रामपूरचे अंतर जास्त नाही. मात्र मेहकर व लोणार तालुक्यातून येणार्‍यांना सुमारे २00 किलोमीटर येणे व २00 किलोमीटर जाणे असे ४00 किलोमीटर अंतर कापावे लागते. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा होण्यासोबतच आर्थिक भुर्दंडही प्रशासकीय स्तरावर तथा सामान्य नागरिकांना सोसावा लागतो.