बुलडाणा : १५ ऑक्टोबर रोजी होणार्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आज तहसील कार्यालयात बुथ लेव्हल ऑफिसरची बैठक घेण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अधिकार्यांनी प्रयत्न करावेत. तसेच प्रत्येक मतदारापर्यंत मतदान स्लीप पोहचली पाहिजे याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश उ पविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी खांदे यांनी दिले. यावेळी तहसीलदार बाजड, मुख्यधिकारी ओव्हळ उपस्थित होते. यावेळी बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील ५८ बुथवरील बीएलओ उपस्थित होते.
मतदान वाढीसाठी बीएलओची सभा
By admin | Updated: October 6, 2014 23:53 IST