शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एम.एड्. अभ्यासक्रमाला विद्यापीठाचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:13 IST

बुलडाणा: बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील एम. एड्. अभ्यासक्रम पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिरवा कंदील दर्शविला आहे. २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात शासकीय अध्यापक विद्यालयात ५0 विद्यार्थ्यांंसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देबुलडाणा शासकीय अध्यापक महाविद्यालयात होणार प्रवेश २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात विद्यालयात ५0 विद्यार्थ्यांंसाठी प्रवेश देण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील एम. एड्. अभ्यासक्रम पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिरवा कंदील दर्शविला आहे. २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात शासकीय अध्यापक विद्यालयात ५0 विद्यार्थ्यांंसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. डी.एड्., बी.ए., बी.एड्., एम.ए. आणि एम.एड्. यासारख्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झालेला आहे. त्यामुळे अशा अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविणे महाविद्यालयांना अडचणीचे जात आहे. परिणामी अनेक महाविद्यलायातील मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम बंद पडत आहे. सन २0१४ मध्ये बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील एम.एड्.  अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांंचे प्रवेश न मिळाल्यामुळे हा अभ्यासक्रम बंद झाला होता. गेल्या तीन वर्षांंपापासून बंद असलेला अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाविद्यलायाकडून प्रयत्न करण्यात येत होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ८ ऑगस्ट रोजी बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात शैक्षणिक सत्र २0१७-१८ पासून एम.एड्. अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्रथम वर्षाला ५0 विद्यार्थी प्रवेशित करण्यासाठी शिफारस केलेली आहे.  सन २0१४ मध्ये बंद पडलेल्या एम.एड्.अभ्यासक्रमाला पुनर्जीवित करून सर्व प्राधिकरणाच्या मान्यता प्राप्त करून बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्यासाठी इच्छुक असणार्‍यांना ही महत्त्वपूर्ण संधी शासकीय अध्यापक महाविद्यालयामुळे प्राप्त झाली आहे.

प्रवेश प्रक्रिया सुरूशासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलडाणा येथे एम.एड्. अभ्यासक्रमात विषयांसाठी पर्याय निवडण्याची प्रक्रिया १४ ऑगस्टपर्यंंत  सुरू राहणार आहे. या विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून डॉ. रोहिणी तडस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. गायकवाड यांनी केले आहे.