मलकापूर (जि. बुलडाणा): राज्यातील शेतकर्यांचा बांध्यावरचा होणारा वाद संपुष्टात आणण्यासाठी येणार्या काळात शासन उपग्रहाद्वारे जमिनीची मोजणी करेल. त्यासाठी अडीच हजार कोटीचा खर्च आहे. आधी सहा जिल्ह्यात तर पुढील टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यात हा प्रयोग होईल, सोबतच सर्व व्यवस्था ऑनलाइन झाल्याने शे तकर्यांना घरपोच सातबारा देण्यात येईल, तशी घोषणा महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांनी येथे केली. येथील महसूल विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ना.खडसे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ भाजप नेते भाऊसाहेब फुंडकर होते. तर प्रमुख उपस्थिती खा.रक्षाताई खडसे, खा.प्रतापराव जाधव, आ. चैनसुख संचेती, आ.गोपीकिशन बाजोरिया, जि.प. अध्यक्ष अलका खंडारे, नगराध्यक्ष मंगला पाटील आदींची होती. ना.खडसे म्हणाले की, अनेक वषार्ंपासून जमिनीच्या वादाची प्रकरणे प्रलंबित आहेत. हे सर्व वाद जमिनीची मोजणी केली तर संपुष्टात येतील. जिल्हय़ातील पूरपीडितांसाठी तसेच रमाई घरकुलासाठी जागाचे समस्या आहे. या सार्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी महसूल विभाग शेतकरी तथा सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल, असे सांगितले. तर शासनाच्या विविध योजनांचा गोषवारा विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी मांडला. आ.चैनसुख संचेती यांनी महसूल विभागाच्या प्रशासकीय इमारतीमध्येच समन्वय साधून जनसमस्या सोडवाव्यात, असे आवाहन केले तर खा.रक्षा खडसे यांनी महसूल प्रशासन लोकाभिमुख व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अपर जिल्हाधिकारी देवानंद टाकसाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष अनिल झोपे, बा.स. प्रशासक साहेबराव पाटील, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता मि िथलेश चव्हाण, एसडीओ दिनेशचंद्र वानखेडे, भाजप नेते मोहन शर्मा, पं.स. सभापती विद्या नारखेडे, रामभाऊ झांबरे, सुनील नाफडे, रूपेश श्रीश्रीमाळ, सोपान खाचणे, अनिल पाचपांडे, दीपक जावरे, उल्हास संबारे, घनश्याम वर्मा आदी हजर होते. संचालन प्रा.गणेश कोलते तर आभार तहसीलदार रवींद्र जोगी यांनी मानले.
उपग्रहाद्वारे होणार शेतजमिनीची मोजणी
By admin | Updated: September 1, 2015 01:40 IST