चिखली : नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्या कार्यकाळात चिखलीचा विकासदेखील क्रिकेटच्या चेंडूप्रमाणे सीमापार होत असून, त्यांनी नगर परिषदेच्या पिचवर आपल्या चौफेर फटकेबाजीने विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. त्यांनी धावांच्या डोंगराप्रमाणे जो विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, तो सर करणे विरोधकांना कदापिही शक्य नाही, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी येथे केले.
युवा नेते कुणाल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्व. दत्ता पैठणकर स्मृतिप्रीत्यर्थ प्रथमच नगराध्यक्षा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जानेवारी रोजी या स्पर्धेचे उद्घाटन धृपतराव सावळे व माजी जि.प. उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुरेशआप्पा खबुतरे, शिवाजीराव बनसोडे, मंगेश व्यवहारे, संजय चेके पाटील, राजू जावळे, काशीनाथ बोंद्रे, नंदकिशोर सावडतकर, अतहर काझी, कपिल खेडेकर, शहजाद, न.प.उपाध्यक्षा वजीराबी शे.अनिस, जि.प.सदस्या डॉ.ज्योती खेडेकर, रामदास देव्हडे, सुरेंद्र पांडे, अनिल पळसकर, पंडितराव देशमुख, राजू गवई, गोपाल देव्हडे, शेखर बोंद्रे, अॅड. राजपाल बडगे, नगरसेवक प्रकाश शिंगणे, गोविंद देव्हडे, सुदर्शन खरात, विमल देव्हडे, नामू गुरुदासानी, दीपक खरात, मो.आसीफ, अ.रऊफ, अनुप महाजन, शैलेश बाहेती, पप्पू राजपूत, अमोल खेडेकर, मनोज खेडेकर, संजय गायकवाड, रहीम पठाण, सुरेंद्र ठाकूर, राजू कुलकर्णी, खालील बागवान, गोविंद कोठारी, नासीर सौदागर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान येत्या काही महिन्यांत नगर परिषदेची निवडणूक घोषित होणार असल्याने आता हाती राहिलेल्या महिन्यांमध्ये कसोटी क्रिकेट न खेळता २०/२० सारखे खेळावे लागणार असून, या वेळात जास्तीत जास्त विकास निधी शासनाकडून खेचून आणण्याचे काम करावे लागणार असल्याचे सावळे यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन गणेश धुंधळे यांनी केले.
शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ आवश्यक
: नगराध्यक्षा बोंद्रे
जीवनामध्ये खेळाचे खूप महत्त्व आहे, आजची पिढी ही मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्यात जास्त व्यस्त असते. याचा विपरीत परिणाम शरीरावर होत असल्याने मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी, म्हणून या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहेत, असे नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.