यावेळी बुलडाणा जिल्हा कुटुंब प्रबोधन संयोजक अनंत कुळकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
नवीन पिढीने आधुनिकतेचा स्वीकार करत आपल्या प्रथा परंपरा जपल्या पाहिजेत. श्रीराम मंदिर निर्माणासोबतच राष्ट्र निर्माण होणार असून, गृह संपर्क अभियानाच्या माध्यमातून ''सबमे राम, सबके राम'' हा भाव निर्माण होणार आहे. या अभियानात मातृशक्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा सहकार्यवाह तथा जिल्हा अभियान सहप्रमुख माधव धुंदाळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या इतिहासात महिलांचा सहभाग सांगतानाच १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या अभियानाची योजना सांगितली. सुरुवातीला प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रूपाली कुळकर्णी, तालुका सेवाप्रमुख सुनील जोशी, ग्रामप्रमुख संतोष झाडे, ग्राम समिती सदस्य नंदाताई उत्तम पवार, आशाताई दामोधर देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपाली धुंदाळे, मीना जोशी, दीपाली देशमुख, मनीषा कापसे यांनी परिश्रम घेतले.