शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गणित मांडणा-यांची गोची

By admin | Updated: October 7, 2014 23:31 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारांचा कल अस्पष्ट!

अशोक इंगळे / सिंदखेडराजा (बुलडाणा)मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघात नेहमीच जातीचे गणित मांडून निवडणूक लढविणार्‍यांची यावेळी गोची झाल्याने त्यांच्यावर कसरत करण्याची पाळी आली आहे. यावेळी कोणत्या उमेदवाराच्या झोळीत मतदानाचा कौल पडणार, हे अस्पष्ट आहे.मातृतीर्थावर भगवा फडकविण्यासाठी, सतत ५ वेळा पराभव होऊनही शिवसेना या मतदारसंघात लढत आहे. गेल्या दोन निवडणुकीत डॉ. शशिकांत खेडेकर पराभूत होऊनही तिसर्‍यांदा पुन्हा त्यांच्या खांद्यावर शिवधनुष्य आले आहे. येथील नेहमीचे प्रतिस्पर्धी आ.डॉ. राजेंद्र शिंगणे मैदानात नसल्याने मतदार मोकळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी रेखाताई खेडेकर यांनी मिळविली आहे. राहीन तर सिंदखेडराजा मतदारसंघातच, हा हट्ट त्यांचा होता. डॉ. शिंगणे यांनी राजवाड्यासमोर त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला त्यामुळे त्यांना ताकद मिळाली आहे.काँग्रेस, मनसे, भाजपा या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांना उमेदवार समजून आखलेली प्रचाराची रणनीती मोडीत निघाली असून, आता प्रचार करताना विकास आणि पक्षाचे कार्य, यावरच भर द्यावा लागत आहे. मतदारसंघातील वंजारी समाजाची एकगठ्ठा मतांवर अनेकांची नजर आहे. काँग्रेसचे प्रदीप नागरे, भाजपाचे डॉ. गणेश मांटे आणि मनसेचे जि.प. सदस्य विनोद वाघ हे आपआपल्या पद्धतीने प्रचार करीत असले तरी आक्रमक प्रचारापेक्षा उमेदवारांच्या स्वभाव गुणांवर कार्यकर्ते मतदारांसमोर झोळी पसरवित आहे. वसंतराव मगर हे राष्ट्रवादीतून बहुजन समाज पार्टीच्या हत्तीवर स्वार झाले आहेत. तर दलित समाजाचे नेते पंडितराव खंदारे हेही निवडणूक रिंगणात आहेत. दोघेही डॉ. शिंगणे यांचे कट्टर सर्मथक समजल्या जातात. त्यामुळे जातीच्या फॅक्टरचा या मतदारसंघात बुगदा झाला असून, मतदारांची सहानुभूती हाच एक मुद्दा समोर येत आहे.