शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 01:08 IST

नदी, नाल्यांना पूर येऊन अनेक वृक्षांची पडझड झाल्याचे वृत्त.

बुलडाणा : गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात वरुणराजा बरसत आहे. सोमवारी दुपारी जिल्ह्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले वाहले असून, अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसानही झाले आहे. कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे टाकलेले बियाणे जमिनीवर येताना दिसत आहे. जिल्ह्यात ४ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची नोंद करण्यात आली. यात बुलडाणा तालुक्यात ३ मिमी, मलकापूर १ मिमी, मोताळा २७ मिमी, नांदुरा ६ मिमी, खामगाव ५.२ मिमी, शेगाव ६ मिमी, जळगाव जामोद ६ मिमी आणि संग्रामपूर तालुक्यात ६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर चिखली, दे.राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा तालुक्यात पाऊस निरंक आहे. १ जूनपासून आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस २१२ मिमी लोणार तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात ९७ मिमी एवढा नोंदविण्यात आला आहे. जून महिना दमदार पावसाअभावी कोरडाच गेल्याने मेहकर व चिखली तालुका वगळता इतर तालुक्यात पेरण्या खोळंबल्या होत्या. एकूण क्षेत्रफळापैकी फक्त २८ टक्केच पेरण्या जून महिन्यात झाल्या होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना नियमित पाऊस येईल अशी शाश्‍वती व दमदार पावसाची प्रतीक्षा लागली होती. अखेर जुलै महिना चांगला निघाला असून, ३ जुलै रोजी जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले. त्यानंतर आज दुसर्‍या दिवशीसुद्धा अनेक तालुक्यात चांगला पाऊस झाला. खामगाव तालुक्यात सकाळपासून अधूनमधून रिमझिम सुरू होती. त्यानंतर दुपारी ४.३0 ते ५.३0 वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. नांदुरा तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. त्याचप्रमाण शेगाव, मलकापूर, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यातही सर्वत्र रिमझिम पाऊस झाला. पहिलाच दमदार पाऊस असल्याने हा पाऊस जमिनीत मुरता झाला. त्यामुळे पाऊस असतानाही नदी-नाले दुथडी भरुन वाहत असले तरी पूर आल्याचे वृत्त नव्हते.