शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

वीर पत्नीने उभारले शहीद पतीचे स्मारक

By admin | Updated: January 26, 2015 00:55 IST

चिखली तालुक्यातील शेलूद येथे शहीद दिलीप जाधव यांच्या स्मारकाचे आज प्रजासत्ताकदिनी होणार लोकार्पण.

सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा):देशसंरक्षणार्थ जम्मू-काश्मीर भागातील कुपवाडा येथे १८ मे २000 साली कारगील युद्धामध्ये शहीद झालेल्या तालुक्यतील शेलूद येथील दिलीप जाधव यांचे स्मारक उभारण्यात येईल अशी ग्वाही तत्कालीन पालकमंत्र्यांनी दिली होती; मात्र या घटनेला तब्बल १४ वष्रे उलटूनही शहीद दिलीप जाधव यांच्या स्मारकाचा वनवास संपला नाही. अखेर वीर पत्नी मीनाबाई जाधव यांनी स्वत:च्या खर्चातून स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या प्रजासत्ताकदिनी होत आहे. स्वत:चा जीव क्षणोक्षणी धोक्यात टाकून कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा वा वणव्यासारखे ऊन. याची पर्वा न करता पोलादी छाती पुढे करून देश संरक्षणार्थ जिल्हय़ातील आतापर्यंत तब्बल २६ जवांनानी देशासाठी बलिदान दिले आहे. या शहिदांचा योग्य सन्मान व्हावा यासाठी ठिकठिकाणी ह्यशहीद स्मारकंह्ण उभारली जातात; परंतु दुर्दैवाने बुलडाणा जिल्हय़ामध्ये दोन स्मारकांचा अपवाद वगळता असा प्रयत्न होताना दिसून येत नाही. मध्यंतरी बुलडाणा जिल्हा परिषदेने शहिदांची स्मारके बांधण्यासंदर्भाने ठराव घेतला होता; मात्र पुढे त्याबाबत सातत्य राहिले नाही. त्यामुळे या शहिदांच्या स्मृती व त्यांच्या शौर्याची प्रेरणा येणार्‍या पिढीला होत राहावी यासाठी आता त्यांच्या परिवारानेच पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. चिखली तालुक्यातील शेलूद येथील मीनाबाई दिलीप जाधव या वीर पत्नीने प्रशासनाकडून स्मारक बांधल्या जाण्याची तब्बल १४ वर्षे वाट पाहल्यानंतर पदरी निराशाच पडल्याने पदरमोड करून दीड लाख रुपयांचे शहीद दिलीप जाधव यांचे स्मारक उभारले असून, त्याचा लोकार्पण सोहळा २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी होत आहे. येणार्‍या पिढीला शहीद दिलीप जाधव यांची शौर्यगाथा कळावी, त्यांच्यापासून ते प्रेरित व्हावे, यासाठी त्यांनी स्मारक बांधण्यासाठी पदरमोड करण्याचा निर्णय घेऊन कोणावरही अवलंबून न राहता तब्बल दीड लाख रुपये खचरून शेलूद येथे शहीद दिलीप जाधव यांचे लक्षवेधी स्मारक उभारून शासन-प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.