शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून

By admin | Updated: April 4, 2017 00:29 IST

साखरखेर्डा येथील २६ वर्षीय महिलेला ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून पतीने ठार मारल्याची तक्रार तिच्या आईने ३ एप्रिल रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिली.

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील २६ वर्षीय महिलेला ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून पतीने ठार मारल्याची तक्रार तिच्या आईने ३ एप्रिल रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत साखरखेर्डा येथील मुजफ्फर हुसेन यांच्या मोठ्या मुलीचे लग्न चिखली येथील मो.इरफान अ.रहेमान (बबलू) यांच्यासोबत झाले होते. त्यांना दोन अपत्य असून, साखरखेर्डा येथेच मुजफ्फर हुसेन यांच्या वाड्यातील एका खोलीत राहत होते. १ एप्रिल रोजी बबलू हा मद्य प्राशन करून घरी आला आणि दरवाजा बंद करून साझीया हिला बेदम मारहाण करू लागला. पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी साझीयाची आई हसिना गेली असता तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली. हसिना ह्या मदतीसाठी इतर नातेवाईकांना हाक मारण्यासाठी गेल्या असता त्यावेळात मो.इरफान याने साझीयाचा गळा आवळून तिला ठार मारले आणि फरार झाला. मुजफ्फर हुसेन यांना घटनेची माहिती मिळताच घरी आले आणि तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. १ एप्रिलला दवाखान्यातून परस्पर मृतदेह हा घरी नेण्यात आला. रात्रभर प्रेत घरातच होते. सकाळी नातेवाईक जमा झाल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यातच बबलू याला प्रथम अटक करा, असा पवित्रा संतप्त महिलांनी घेतला. २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता मर्ग दाखल करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात विवाहितेच्या अंगावर मारल्याच्या जखमा आढळून आल्या आणि गळ्याभोवती फास आवळल्याची खून आढळून आली. २ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता मृतकाचा दफनविधी पार पडला. ३ एप्रिल रोजी मृतकाची आई हसिना हुसेन यांच्या तक्रारीवरून आरोपी मो.इरफान याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.