मेहकर (बुलडाणा): माहेरवरुन दोन लाख रुपये आणण्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याची घटना शहरात घडली असून, याप्रकरणी सासरकडील ९ जणांविरुद्ध ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील अफरीनबी शे.अमीन हिच्याकडे तिच्या सासरकडील मंडळींनी माहेरवरुन २ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता; परंतु अफरीन शे.अमीन ही सासरकडील मंडळींच्या मागणीची पूर्तता करु शकत नसल्याने सासरकडील मंडळी तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करीत होते. यासंदर्भात अफरीनबी शे.अमीन हिने मेहकर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शे.अमीन शे.नुरमहंमद, शिरफानबी शे.नुरमहंमद, शे.आसिफ शे.नुरमहंमद, शे.आरिफ शे.नुरमहंमद, शे.नाजबी शे.आरिफ, अफसाना शे.आरिफ, शे.सलीम शे.हसन, जैबू शे.सलीम, शे.अमीन शे.सलीम सर्व रा.अंढेरा यांच्याविरुद्ध कलम ४९८, ३२३, ५0४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्या त आला आहे.
दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ
By admin | Updated: November 6, 2014 23:21 IST