शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

पुरात वाहुन गेल्याने बाजार समिती संचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

अमडापूर / मेहकर : नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने मेहकर बाजार समितीचे शिवसेनेचे संचालक पुंजाजी नारायण कान्हे (४८) यांचा ...

अमडापूर / मेहकर : नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने मेहकर बाजार समितीचे शिवसेनेचे संचालक पुंजाजी नारायण कान्हे (४८) यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला़ अमडापूर पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डाेंगरगावजवळ ही घटना घडली़

मेहकर बाजार समितीचे संचालक पुंजाजी कान्हे हे तालुक्यातील सारशिव येथे वास्तव्यास आहेत. रविवारी त्यांच्या मुलीची प्रसूती झाली हाेती़ त्यांना भेटण्यासाठी ते दुचाकीने बुलडाणा गेले होते. परत मंगरूळ नवघरे मार्गे येताना त्यांनी घरी कोणी नसल्याने सावरखेडवरून सारशिव न येता सासुरवाडीला डोंगरगावकडे वळले. सावरखेड जवळ डोंगरगाव रस्त्यावर छोट्या नाल्याला रात्री अंदाजे साडेआठच्या दरम्यान परिसरात पाऊस झाल्याने पूर आला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी नाल्याच्या पाण्यात मोटरसायकल टाकली व ते वाहून जात समोर बोगद्यात अडकले. मात्र या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी अमडापूर पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूंची नाेंद केली आहे़

===Photopath===

070621\img-20210607-wa0018.jpg

===Caption===

शिरूर अनंतपाळ येथील पेट्रोल पंपावर आंदोलन