शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

खत-बियाणे खरेदीचा बाजार ठप्प

By admin | Updated: June 12, 2014 22:42 IST

कोट्यावधी रुपयाची उलाढाल असणारा खते, बिबीयाणाचा बाजार सध्या ठप्प आहे.

बुलडाणा : कोट्यावधी रुपयाची उलाढाल असणारा खते, बिबीयाणाचा बाजार सध्या ठप्प आहे. लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनेत असलेला शेतकर्‍याने बियाणे खरेदीसाठी हात आखडला आहे. आतापयर्ंत केवळ २0 टक्केच बियाण्यांची विक्री झाल्याची माहीती बियाणे विक्रेत्यांनी दिली. मागील वर्षी याच काळात जवळपास ८0 टक्के बियाणाची विक्री झाली होती. एक चांगला दमदार पाऊस झाल्यानतंर शेतकरी बियाणे खरेदीला प्रारंभ करतील त्यानंतरच गर्दी वाढेल.गतवर्षी खरीप हंगामात अतवृष्टी आणि रब्बी हंगामात झालेली गारपिट यामुळे शेतकरी पूर्णत:उध्दवस्त झाला आहे. घेतलेले बँकांचे कर्जही परतफेड करू शकला नाही. मागील वर्षी तर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने शेतकर्‍यांना पिक कर्जही दिले नव्हते. या अस्माणी संकटामुळे यावर्षी पुन्हा शेतकर्‍या समोर पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. हातात पैसा नाही आणि कर्जही मिळत नाही, अशा विवंचनेत शेतकरी आहे. खरीप हंगामासाठी मशागत करून शेती सज्ज आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. मागील वर्षी मृग नक्षत्रात शेतकर्‍यांच्या पेरण्या आटोपल्या होत्या. यावर्षी मृग नक्षत्र सध्या कोरडे जाण्याच्या मार्गावर आहे. अजूनही उन्हाचा तडाखा कमी झाला नाही. त्यामुळे शेतकरी अद्यापही बी-बियाणे खरेदी करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे कृषी केंद्र ओस दिसत आहेत. जिल्ह्यात घाटाखाली मोताळा, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील काही भागात धुळ पेरणी होती. तर बुलडाणा तालुक्यात धाड, चांडोळ, मासरुळ, मौंढाळा या भागात धुळ पेरणी शेतकरी करतात. यावर्षी सुध्दा काही भागात धुळ पेरणी झाली. यामध्ये कपाशी, मका,भुईमुगाची पेरणी केल्या जाते. जिल्ह्यातील मागील वर्षी १३ तालुक्यात सोयाबीनचा पेरा २६६९२९ हेक्टर क्षेत्रावर होता. यावर्षी ३ लाख ६१ हजार ८९0 हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. गत वर्षीच्या तुलनेत हे पेरणी क्षेत्र जास्त आहे. तर तूर, मुंग, उडिद आणि इतर कडधान्य पिकासाठी एकून १ लाख १९ हजार ५५२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. कृषी केंद्रचालकांनी उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात बियाण्यांचे बुकींग केले. कपाशी, सोयाबीनच्या बियाण्यांनी कृषी केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र खरेदीसाठी शेतकरीच दिसत नाही. शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा आहे. चार एकराच्या आतील शेतकरी वेळेवर खत, बिबीयाणे खरेदी करतो. सध्या शेतकरी बी-बियाण्यांची चाचपणी करीत आहे. एखादा चांगला पाऊस झाला म्हणजे खते, बियाणे खरेदीला वेग येईल. सध्यातरी शेतकर्‍यांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसत नाही. बियाण्यांचे दर कमी होण्याची प्रतीक्षाही शेतकर्‍यांना आहे.