शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

घोषणांचाच बाजार, फेरीवाल्यांच्या हाती दमडीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:36 IST

संचारबंदीमध्ये कौटुंबिक अर्थकारण प्रभावित होण्याची शक्यता पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४४६ कोटी रुपयांच्या पॅकेजअंतर्गत ...

संचारबंदीमध्ये कौटुंबिक अर्थकारण प्रभावित होण्याची शक्यता पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४४६ कोटी रुपयांच्या पॅकेजअंतर्गत जिल्ह्यातील ८,२६३ फेरिवाल्यांना १ कोटी २३ लाख ९४ हजार ५०० रुपयांची मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र, अग्रणी बँक, पालिका प्रशासन विभागाकडे यासंदर्भातील नेमकी माहितीच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. पालिकास्तरावरच हा विषय हाताळल्या जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नेमकी किती जणांना ही मदत मिळाली, हेही स्पष्ट होत नाही. परिणामी ‘नुसताच घोषणांचाच बाजार, फेरीवाल्यांच्या हाती दमडीही नाही’ अशी स्थिती आहे. गेल्यावर्षी मिशन बिगीन अंतर्गत जिल्ह्यातील ८,२६३ पैकी ५,७०० फेरीवाल्यांना ५७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली होती. त्यामुळे बँकांकडे जिल्ह्यातील फेरीवाल्यांचा अद्ययावत डाटा उपलब्ध आहे. मात्र, फेरीवाले अद्यापही मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे.

--अशी आहे फिरवाल्यांची संख्या--

बुलडाणा तालुक्यात १,१७८, चिखली १,१३८, देऊळगाव राजा २९९, सि. राजा १२७, मेहकर ३५६, लोणार २५६, संग्रामपूर ४०, शेगाव ८७४, खामगाव १०१५, नांदुरा ११८८, मलकापूर १२६८, जळगाव जामोद ४४३, मोताळा ८१ याप्रमाणे जिल्ह्यात फेरीवाल्यांची संख्या आहे. केंद्राच्या आत्मनिर्भर पॅकेजच्या वेळी या फेरीवाल्यांनी मदतीसाठी अर्ज केले होते.

--पायडल रिक्षाचालकांची माहिती पाठवली--

राज्य शासनाने पॅकेज जाहीर केल्यानंतर बुलडाणा पालिकेने शहरात पायडल रिक्षा चालवीत असलेल्या सहा जणांची माहिती नगर विकास विभागाकडे पाठविली असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

--पालिका प्रशासनाकडेही उपलब्ध नाही माहिती--

जिल्ह्यातील पालिकांवर नियंत्रण ठेवून असलेल्या पालिका प्रशासन विभागाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडेही अनुषंगिक माहिती उपलब्ध नसल्याचे पालिका प्रशासन अधिकारी मनोहर अकोटकर यांनी सांगितले. बुलडाणा पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे हेही संपर्क कक्षेच्या बाहेर होते.