शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषिकांना मावशीची ओळख नाही

By admin | Updated: September 14, 2014 00:38 IST

प्राथमिक ज्ञान कमी : चित्रपट, प्रसारमाध्यमांचा जास्त प्रभाव

बुलडाणा : भाषा ही दोन संस्कृतींना एकत्र आणणारे माध्यम आहे. देशात विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. त्यापैकी हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्राची मा तृभाषा मराठी असली तरी अनेक ठिकाणी हिंदी भाषा बोलण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषेला आई, तर हिंदी भाषेला मावशी म्हणून ओळखण्यात येते; मात्र मराठी व हिंदी भाषा बोलणार्‍या अनेकांना मावशीविषयी पूर्ण ओळख नसल्याचे दिसून येते. १४ सप्टेंबर रोजी हिंदी भाषा दिवसानिमित्त लोकमतने केलेल्या सर्वेक्षणात हिंदी भाषेचे प्राथमिक ज्ञान नसल्याचे दिसून आले. याबाबत बुलडाणा शहर परिसरातील महाविद्यालयीन तरुणांना हिंदी भाषेचे प्राथमिक ज्ञान किती आहे, याबाबत १0 प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात मराठी भाषिकांना हिंदी या मावशीची ओळख नसल्याचे दिसून आले.* हिंदी दिवस १४ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो, हे फक्त ४२ टक्के तरुणांना माहीत होते. यावरून हिंदी बोलणार्‍या तरुणाईला हिंदी भाषेचे प्राथमिक ज्ञान कमी असल्याचे दिसून आले.* ५६ टक्के तरुणांनी मुन्शी प्रेमचंद हे हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक असल्याचे नमूद केले; मात्र १८ टक्के तरुणांनी आर.के. लक्ष्मण हे हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक असल्याचे नमूद केले. * हिंदी भाषेतील म्हणी फार प्रसिद्ध असून, जवळपास ७0 टक्के तरुणांनी काला अक्षर..भैस बराबर नमूद करून हिंदी म्हणींचे चांगले ज्ञान असल्याचे सांगितले.हिंदी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिल्या जाते ?          या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तब्बल ६४ टक्के युवकांनी देवनागरी हा पर्याय निवडला. १0 टक्के युवकांनी श्रीलिपी, तर १८ टक्के युवकांनी मोडीलिपी हा पर्याय निवडला. हिंदीचा वापर दैनंदिन व्यवहारात लिखाणासाठी करता काय ?          मराठी मातृभाषा असली तरी हिंदीचा वापर अनेक ठिकाणी करण्यात येतो;मात्र दैनंदिन व्यवहारात हिंदी भाषेचा लिखाणासाठी वापर करता काय ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी ४0 टक्के तरुणांनी नकार हा पर्याय निवडला. तर ३२ टक्के तरुणांनी कधी-कधी, तर १८ टक्के व्यक्तींनी ह्यहोयह्ण हा पर्याय निवडला. यावरून हिंदी भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारात कमी होत असल्याचे दिसून आले.हिंदी भाषेतील पूर्णविराम कसा दिला जातो ?         हिंदी भाषेतील पूर्णविराम (.), ( !), (।) यापैकी कसा दिला जातो, याबाबत ५२ टक्के तरुणांनी चुकीचा (।) असा पर्याय निवडला. तर २८ टक्के तरुणांनी ( !) हा पर्याय निवडला. याशिवाय १२ टक्के तरुणांनी (.) हा पर्याय निवडला. यावरून हिंदी भाषेतील पूर्णविरामाबाबात तरुणांना पुरेसे ज्ञान नसल्याचे दिसून आले. अनेक तरुणांनी पूर्णविरामाबाबत माहिती नसल्याचे सांगून पर्याय निवडले नाहीत.