महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले व सचिव प्रा.बाळासाहेब माने यांनी नुकतीच बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष प्रा. गणेश शिंदे, उपाध्यक्ष प्रा. गजानन गाडेकर व प्रा.रवींद्र काळे, सचिव प्रा.ऋषिकेश कांडलकर,सहसचिव प्रा. विजयश्री सावजी,खजिनदार प्रा.सुनील काकडे, विशेष निमंत्रित तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा.एस.एस. जवंजाळ, प्रा.अशोक डोईफोडे व प्रा.गजानन कुटे, सदस्य प्रा. नीळकंठ राठोड, तालुका प्रतिनिधी- मेहकर प्रा.संजय भाकडे, लोणार- प्रा.ब.ना.सानप, सिंदखेडराजा- प्रा.मदन जाधव, देऊळगावराजा- प्रा.गजानन साबळे, चिखली- प्रा.धरमसिंग जाधव, बुलढाणा- प्रा.अरुण बारोटे,मलकापूर- प्रा.किसन वरखेडे, मोताळा- प्रा.विनोद गवई,नांदुरा- प्रा. आर.एन.चव्हाण, खामगाव- प्रा.कल्पना सोनटक्के, शेगाव- प्रा.विनोद राठोड, संग्रामपूर- प्रा.राजेश गावंडे, जळगाव जामोद- प्रा.शरद गावंडे यांची निवड करण्यात आली. मराठी भाषा व व्यवहार समृद्ध तथा वृद्धिंगत करण्यासाठी या महासंघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा.गणेश शिंदे व सचिव प्रा.ऋषिकेश कांडलकर यांनी दिली.
मराठी भाषा विषय शिक्षक जिल्हा कार्यकारिणी गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST