शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातही मराठा समाजाने बांधली एकीची वज्रमूठ!

By admin | Updated: September 5, 2016 00:47 IST

पहिलीच बैठक ठरली विक्रमी; २६ सप्टेंबरला निघणार क्रांती मोर्चा.

बुलडाणा, दि. ४ : कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ व समाजहिताच्या मागण्यांसाठी औरंगाबाद, उस्मानाबाद, जळगाव, बीड आणि परभणी या शहरात मराठा समाज बांधवांच्या रेकॉर्डब्रेक मोर्चानंतर आता बुलडाण्यातही मराठा समाज एकवटला आहे. केवळ सोशल मीडियावरील माहितीवरून कोणत्याही निमंत्रणाविना रविवार, ४ सप्टेंबरला कला महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला समाजबांधवांची विक्रमी उपस्थिती होती. या विक्रमी बैठकीत येत्या २६ सप्टेंबर रोजी विशाल मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. कोपर्डी येथील घटनेच्या निषेर्धात राज्यभर मराठा समाज एकवटतो आहे. बुलडाणा जिल्ह्यातही ही एकीची ज्योत रविवारी नियोजन बैठकीच्या माध्यमातून पेटली. कोणालाही वैयक्तिक निमंत्रण न देता केवळ व्हॉटस् अँप व फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून बैठकीची माहिती देण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनंतर एवढय़ा कमी कालावधीत या बैठकीसाठी समाजबांधव विक्रमी संख्येने उपस्थित होते. खासदार, माजी मंत्री, मराठा समाजाचे सर्व आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी जि.प. अध्यक्ष, आजी, माजी पंचायत समिती सदस्य यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, विद्यार्थिंंनी, महिला प्रतिनिधींचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. २६ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मोर्चा कुठल्याही समाजाच्या, पक्षाच्या किंवा शासन, प्रशासनाच्या विरोधात नसून, मराठा समाजाच्या एकत्वासाठी आणि न्याय हक्कासाठी राहील, ही भूमिका या बैठकीच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आली. समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. काही मिनिटांतच जमला लाखोंचा निधी ! मोर्चासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने समाजातून वर्गणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्गणीचे आवाहन करताच अवघ्या काही मिनिटांमध्ये लाखो रुपयांची वर्गणी जमा झाली; परंतु सदर निधी हा कुणाजवळ जमा न करता बँकेमध्ये एक संयुक्त खाते उघडून त्यामध्ये जमा करावा आणि नंतर त्या संपूर्ण रकमेचा हिशेब सर्वांंसमोर मांडावा, असे ठरले. महिलांची उपस्थिती ठरणार लक्षवेधीबैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांंनी सहपरिवार मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार केला. ह्यपाटील मोर्चात आणि पाटलीनबाई घरीह्ण अशी परिस्थिती उद्भवू नये आणि समाजाच्या एकोप्यासाठी घराघरांतील महिलांनीही या मोर्चात सहभागी होण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे या मोर्चातील महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरण्याचे संकेत या बैठकीत मिळाले.