शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मराठा वज्रमूठ!

By admin | Updated: September 27, 2016 03:28 IST

बुलडाण्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा ; आतापर्यंतच्या सर्व मोर्चांचे ‘रेकॉर्ड’ मोडीत.

बुलडाणा, दि. २६- मराठा समाजाचा विराट मोर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सर्व मोर्चांचे 'रेकॉर्ड' मोडीत काढलेल्या या अतिविराट आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार लाखो सकल मराठे झाले व मराठय़ांची वज्रमूठ जिल्हावासीयांनी अनुभवली.आपल्या विविध मागण्यांसाठी लाखोंच्या संख्येने सकल मराठा समाज एकवटून सोमवारी रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यातील मराठा समाजाचे डॉक्टर, वकील, अभियंते यासह विविध विभागातील कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते. शहरात येणार्‍या प्रत्येक रस्त्यावर आयोजकांनी वाहनतळाची व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी वाहने ठेवून मराठा समाजबांधव मोर्चाचे ठिकाण जयस्तंभ चौकात दाखल होत होते. जयस्तंभ चौकाला जोडणार्‍या परिसरातील पाचही मार्ग महिला व पुरुषांनी फुलून गेले होते. यावेळी अनेकांनी आपल्याला हव्या असलेल्या मागण्या मांडल्या. या मोर्चाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठा समाज लाखोंच्या संख्येत मोर्चात सहभागी झाला. मोर्चासाठी सकाळी ७ वाजेपासून महिला, महाविद्यालयीन युवती, नागरिक रस्त्यावर उतरले होते. ग्रामीण भागातील सकल मराठा बांधव सकाळी ९ वाजता मोठय़ा प्रमाणात आला. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता, भाषणबाजीला फाटा देत, शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. स्वयंस्फूर्तीने लाखो मराठय़ांचा जनसमुदाय मोर्चात सहभागी झाल्याने, प्रथमच एवढा प्रचंड विराट मोर्चा ठरला. बुलडाणा शहरात पहिल्यांदाच एवढा भव्य मोर्चा निघाला. तसेच गत काही दिवसांपासून या मोर्चाची चर्चा जिल्हाभर असल्यामुळे शहरातील नागरिक हा मोर्चा बघण्यासाठी सरसावले होते. प्रत्येक घरावर, इमारतींवर तसेच ठिकठिकाणी नागरिक मोर्चा पाहण्यासाठी गर्दी करीत होते. सकाळी ८ वाजतापासून, तर दुपारी ३ वाजेपर्यंत शहरात माणसेच माणसे दिसत होती. दिवसभर मोर्चातील संख्येची चर्चा नागरिकात होती.