शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अनेक इच्छुकांना लागले सरपंच पदाचे डोहाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:08 IST

ग्रामीण भागातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचाय तींचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन गावकारभारी  निवडीच्या प्रक्रियेने खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले  आहे. अशातच प्रथमत: सरपंच निवड ही थेट जनतेतून  निवडल्या जाणार असल्याने सरपंच पदाचे अनेकांना डोहाळे  लागल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअटीतटीची लढत होणार खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले

राजू पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर: ग्रामीण भागातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचाय तींचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन गावकारभारी  निवडीच्या प्रक्रियेने खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले  आहे. अशातच प्रथमत: सरपंच निवड ही थेट जनतेतून  निवडल्या जाणार असल्याने सरपंच पदाचे अनेकांना डोहाळे  लागल्याचे चित्र आहे.राजकीयदृष्ट्या सर्वांच्या नजरा सुलतानपूर गावाच्या सत्ता  केंद्राकडे लागून असतात. तर सुलतानपूरचे सरपंचपद हे  मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने अनेक प्रस्तापित  इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे  मागासवर्गीयमधील अनेक चेहरे बाशिंग बांधून आपली  योग्यता पटवून सांगताना दिसत आहे. यावेळेस सुलतानपूरची  वार्ड संख्या सहा झाली असून, सदस्य संख्या १७ झाली  आहे. त्यामध्ये ९ महिला तर ८ पुरुष असणार आहेत. त्यामुळे  अनेक इच्छुक उमेदवार आपली ताकद दाखवून महिलांसह  निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अर्ज  भरण्यासाठी १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याने  अनेकांनी मतदार याद्या आणून मतदारांच्या भेटीसाठी सुरू  केल्या आहेत; मात्र पूर्वीच्या वार्डाची तोडफोड होऊन येथे  वार्ड रचना तयार केली गेली असल्याने या वेळेसच्या  निवडणुकीत मागील अंदाज निकामी ठरणार आहेत. त्यामुळे  विजयाचे गणित अवघड असल्याचे बोलल्या जात आहे.यावेळी युवक वर्ग मोठय़ा ताकदीने ग्रामपंचायत सत्ताकारणा त सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचे बोलल्या जाते. तर  गावातील ज्येष्ठ पुढारी पार्टीचालकसुद्धा नव्या  परंतु  प्रामाणिक व होतकरू चेहर्‍याचा शोध घेत आहेत. सरपंच  पद हे जनतेतून निवडल्या जाणार असल्याने जो-तो आपल्या  गटाचा सरपंच कसा होईल, यासाठी तयारी करीत आहे. म तदार मात्र दिवसेंदिवस चांगलाच हुशार, विकासाची जाण,  सुशिक्षित, सुज्ञ उमेदवारालाच आपली पसंती देतील व पार्टी  नेतेसुद्धा अशाच उमेदवाराला आपले सर्मथन देतील, एवढे  मात्र खरे!

जुन्यांना नारळ, तर नव्यांना संधीया अगोदर ग्रामपंचायत सत्ताकारणात ज्यांनी पदे भोगली,  असे काही चेहरेसुद्धा या वेळेस नव्या ताकदीने मतदारांच्या  भेटीगाठी घेताना दिसत आहेत. सत्ता भोगूनसुद्धा त्यांची अ पेक्षा मावळली नसली तरी मतदारराजा अशा जुन्या चेहर्‍यांना  मात्र ‘नारळ’ देत नाकारणार असल्याची चर्चा आहे.