शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अनेक दिव्यांग कर्मचारी महत्त्वाच्या ‘टेबल’वर!

By admin | Updated: May 17, 2017 01:20 IST

जिल्हा परिषद सभापती, मोठ्या अधिकाऱ्यांचे ‘पीए’ही दिव्यांग

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शिक्षण क्षेत्रासोबतच जिल्हा परिषदेतील अन्य विभागातही मोठ्या प्रमाणात दिव्यांग कर्मचारी असून, अनेक महत्त्वाच्या टेबलवर त्यांची वर्णी लागली आहे. जिल्हा परिषदेचे मोठे अधिकारी व सभापतीचे काही ‘पीए’ही दिव्यांग असल्याची माहिती आहे. शासनाच्या दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता अनेक सुदृढ कर्मचारी दिव्यांग झाले. यापैकी काहींना दृष्टिदोष, काही कर्णबधिर तर काही अस्थिव्यंग झाले. जिल्हा परिषदेत हे दिव्यांग असलेले कर्मचारी एकाच ठिकाणी दहा ते पंधरा वर्षांपासून नोकरी करीत आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांची बदली होत नसल्याच्या नियमांचा फायदा या ठिकाणी अनेक दिव्यांग कर्मचारी घेत आहेत. त्यामुळे अन्य कर्मचारी मात्र त्रस्त झाले असून, त्यांच्यावर अन्याय होत आहे. जिल्हा परिषदेत विविध विभागात काही महत्त्वाचे पद असते, त्या पदावर असताना अनेकांशी संबंध येतो, तसेच आर्थिक देवाण-घेवाणही होते. अशाच अनेक महत्त्वाच्या टेबलवर दिव्यांग कर्मचारी आहेत. कर्णबधिर व दृष्टिदोष असलेले कर्मचारी महत्त्वाच्या टेबलवर कस, असा प्रश्न उपस्थित होतो. काही जिल्हा परिषदेचे सभापती व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पीएही दिव्यांग असल्याची माहिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. शिक्षक संघटनांच्या मागण्यांना केराची टोपली जिल्ह्यातील काही कर्मचारी बोगस दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन नोकरीत विविध लाभ लाटत असल्याचा प्रकार शिक्षक संघटनांच्या लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करीत निवेदने देण्यात आली; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निवेदनांना केराची टोपली दाखवित कोणतीही कारवाई केली नाही. जिल्ह्यात अनेक कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेतले असल्याचे निदर्शनास आले आहे. याची माहिती अन्य कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांच्यावतीने अनेकदा बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. शिक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नसल्यामुळे शिक्षक संघटनांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली; मात्र त्यानंतरही अद्याप कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही, त्यामुळे संघटनाही हतबल झाल्या आहेत. खऱ्या दिव्यांगांची हेळसांड थांबविण्याची गरजएसटीने प्रवास करीत असताना प्रमाणपत्रासाठी खऱ्या दिव्यांगांची हेळसांड होते. याबाबत चौकशी करून एसटी महामंडळाने खऱ्या दिव्यांगांसाठी सवलतीचे कार्ड त्वरित सुरू करावे, अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन लक्ष्मण उबरहंडे यांनी केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आरोग्यसेवा संचालनालय, मुंबई यांच्या २७ जून २०१६ च्या पत्रानुसार अपंग विभागांतर्गत कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या व्यक्तींना नवीन दिव्यांग प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आणि त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र हे रद्द करण्यात येऊ नये, असा आदेश आहे. तरी अशा दिव्यांग प्रमाणपत्रधारकांना कोणत्याही योजनेतून डावलून शासनाच्या नियमांचा अपमान करू नये तसेच खरोखर दिव्यांग असलेल्यांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी अपंग एसटी पास सवलत ही दिव्यांगांना मिळत नाही. तरी दिव्यांग एसटी पास सवलत कार्ड हे समाज कार्यालय, जि.प. बुलडाणा यांचे अंतर्गत पूर्ववत सुरू करून दिव्यांगांची हेळसांड थांबवावी, अशीही मागणी गजानन उबरहंडे यांनी निवेदनात केली आहे.