शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘मनोधैर्य’ला निधीचा आधार नाही!

By admin | Updated: February 4, 2016 01:42 IST

बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रस्ताव पडून; शासनाकडे ८0 लाख रुपयांची मागणी.

बुलडाणा: पीडित, अत्याचारित महीला व बालकांचे मनोबल खचू नये, त्यांना समाजात प्रतिष्ठा व जगण्याचा आधार मिळावा, यासाठी राज्य शासन अशा पीडित, शोषित महिला व बालकांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करीत असते. बुलडाणा जिल्ह्यात अशा लाभार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असताना, या योजनेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून निधी नसल्यामुळे मनोधैर्य योजना ठप्प झाली आहे. महिलांवरील अत्याचार, बालकांचे लैंगिक शोषण, महिलांवर अँसिड हल्ला करणार्‍या गुन्हेगारांना गंभीर शिक्षा देत असतानाच या गुन्ह्यातील पीडित महिला व बालकांना समाजात प्रतिष्ठा व आत्मविश्‍वास पूर्णपणे मिळवून देणे हे तितकेच आवश्यक आहे. पीडित महिला व बालकांना समाज वेगळ्या नजरेने पाहतो. हे टाळण्यासाठी आणि अशा महिला व बालकांना शारीरिक, मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी शासन त्यांना वित्तीय साहाय्य करते. याशिवाय त्यांचे समुपदेशन, निवारा, वैद्यकीय व कायदेशीर मदत आदी आधार सेवा तत्पर उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करते. एका लाभार्थ्याला दोन लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जातो. बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी ६0 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी मात्र मनोधैर्य योजनेमध्ये पैसाच नसल्यामुळे या योजनेतील वाटप ठप्प झाले आहे. महिला व बाल विकास विभागाकडे जवळपास ४0 लाभार्थींचे प्रस्ताव पडून असून, त्यांच्यासाठी ८0 लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. मागील आठ महिन्यांपासून मनोधैर्य योजनेवर निधी न आल्यामुळे लाभार्थींना वाटप ठप्प झाले आहे.