शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांवर मात करीत घडी बसविणार-  मनोहर अकोटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 15:50 IST

Khamgaon News खामगाव नगर पालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांच्याशी साधलेला संवाद.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  खामगाव शहरातील विविध समस्यांवर मात करीत खामगाव पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची घडी बसविण्यावर आपला भर राहणार आहे. खामगाव नगर पालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांच्याशी साधलेला संवाद.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पालिकेतील समस्यांबाबत काय सांगाल?बुलडाणा जिल्यातील सर्वात मोठ्या आणि विकसनशील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सुत्रं नुकतीच घेतली आहेत. शहरातील प्रमुख समस्यांचा आढावा सुरूवातीलाच घेतला जात आहे. सुरूवातीला लहान आणि सहज सुटणाऱ्या समस्यांना सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे. प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवामुळे समस्या अजिबात मोठ्या नाहीत. मात्र, विविध समस्यांवर मात करीत खामगाव पालिकेची आर्थिक घडी बसविण्यासाठी आपले प्राधान्य राहील.

खामगाव शहरातील अतिक्रमणाबाबत आपली भूमिका काय?शहरातील अतिक्रमण आणि विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून पालिकेतील सर्वच विभाग प्रमुखांद्वारे आढावा घेतल्या जात आहे. अतिक्रमण निमूर्लनासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, पोलीस आणि महसूल प्रशासनाद्वारे संयुक्त मोहीम राबविण्यासंदर्भात निर्णय विचाराधीन आहे.

जलसाठ्यांमध्ये मुबलक साठा असतानाही शहरात पाणी टंचाई बाबत काय सांगाल?सामान्य नागरिकांपर्यंत तात्काळ पाणी पोहोचविण्यासाठीच आपले पहीले प्राधान्य आहे. त्याअनुषंगाने शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजना तात्काळ मार्गी लावण्यासाठी रूजू झाल्याच्या पहील्या दिवसांपासूनच आपण कामाला लागलो आहे. त्यामुळेच पाणी समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून पालिका प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे.

 खामगाव शहरातील नागरिकांकडून आपल्या अपेक्षा काय?शहरातील समस्या सोडविण्यासाठी सुरूवातीपासूनच नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसादाची आपली एकमेव अपेक्षा आहे. या शिवाय मालमत्ता कर, स्वच्छ सर्वेक्षण, माझी वंसुधरा अभियानासोबतच पालिका प्रशासनाच्या प्रत्येक चांगल्या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा. प्लास्टिक निमूर्लन मोहीमेसोबत ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा उचल प्रक्रीया गतीमान करण्यासाठी सहकार्य करावे. 

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत