शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात धिक्कार मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:08 IST

माता महाकाली नगरातील संतप्त नागरिकांनी गुरुवारी पालिका प्रशासनाविरुद्ध धिक्कार मोर्चा काढून तहसील चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देमाता महाकाली नगरातील अतिक्रमणामुळे नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : येथील माता महाकाली नगरातील नगीनदास बेरागी  यांनी देवी मंदिर परिसरात अनधिकृतरीत्या केलेले अतिक्रमण व  घाण पाण्यामुळे देवीची विटंबना या विषयावर निवेदन देऊन व  उपोषण करूनही कारवाई झाली नाही. त्या निषेधार्थ गुरुवारी  परिसरातील संतप्त नागरिकांनी पालिका प्रशासनाविरुद्ध धिक्कार  मोर्चा काढून तहसील चौकात रास्ता रोको आंदोलन केले.येथील माता महाकाली नगरातील रहिवासी नगीनदास बैरागी  यांनी माता महाकाली मंदिर परिसरात अनधिकृतरीत्या बांधकाम  करून अतिक्रमण केले आहे. सांडपाण्याचा निचरा करून  त्यांच्याकरवी मंदिराची विटंबना सुरु असल्याचा आरोप माता  महाकाली नगरातील असंख्य पुरुष व महिलांचा आहे.त्यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.  ऑगस्ट महिन्यात उपोषण करण्यात आले असता कारवाईचे  आश्‍वासन नगरपालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. प्र त्यक्षात मात्र कारवाई नाही. त्याच्या निषेधार्थ माता महाकाली  नगरातील संतप्त पुरुष, महिला १२ ऑगस्ट रोजी रस्त्यावर उ तरले. बुलडाणा रस्त्यावरून दुपारी १२ वाजता धिक्कार मोर्चा  काढण्यात आला.नगरपालिका प्रशासनाविरुद्ध तथा नगराध्यक्षाविरुद्ध मुर्दाबाद  मुर्दाबादची नारेबाजी करून तहसील चौकात आंदोलनकर्त्यांनी  रास्ता रोको आंदोलन केल्याने बराच काळ वाहतूक ठप्प झाली. या आंदोलनात कृष्णा मेहसरे, अनिल बगाडे, राजू सपकाळ,  प्रकाश धोरण, श्रद्धा धोरण, भाग्यश्री मेहसरे, रुख्मिणी दाणे,  अनुसया भोपळे, सविता वेरुळकर, उर्मिला जुनारे, चंद्रकला  खांडेकर, कांताबाई जाधव, वत्सलाबाई ढोले, अर्चना चित्ते,  सयाबाई धोडे, श्रुती पटणी, मथुरा ढोले, जनाबाई बगाडे  आदींसह असंख्य पुरुष व महिला सहभागी होत्या.

माता महाकाली नगरातील अनधिकृत बांधकामाविषयी संबंधि तास कायदेशीर नोटीस देण्यात आली. विहित कालावधीमध्ये  त्यांनी निर्धारित रक्कम भरून नवीन नियमानुसार बांधकाम  रेग्युलर करण्याविषयी मागणी केल्याने तशी कारवाई प्रशासनाला  करावी लागते. उर्वरित विषयात नियमानुसारच कारवाई होईल.- श्रीनिवास कुरे,मुख्याधिकारी, न.प. मलकापूर.

माता महाकाली मंदिराची जागा वडलोपाजिर्त सात पिढय़ांपासून  आमच्या ताब्यात आहे. तसे कागदोपत्री पुरावेदेखील  आमच्याजवळ आहेत; पण काही मंडळी राजकीय द्वेषापायी  वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेत आहेत. मंदिर परिसरातील  जागा आमच्याकडून बळकाविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.- नगीनदास बैरागी,माता महाकाली नगर, मलकापूर.