शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

बुलडाणा जिल्ह्यात मका विक्रीचा गोरखधंदा जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 13:33 IST

मक्याचे वितरण झाल्याने नाराजीचा सूर उमटत असतानाच, तांदळाप्रमाणेच मका विक्रीच्या गोरखधंद्याने जिल्ह्यात डोकेवर काढल्याचे चित्र आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात माहे आॅगस्टच्या धान्याचे वाटप करण्यात आले आहे. अंत्योदय, शेतकरी आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना गव्हाऐवजी मक्याचे वितरण झाल्याने नाराजीचा सूर उमटत असतानाच, तांदळाप्रमाणेच मका विक्रीच्या गोरखधंद्याने जिल्ह्यात डोकेवर काढल्याचे चित्र आहे.बारदाण्यामुळे रेशनचे तांदूळ ओळखने सुलभ असल्याने जिल्ह्यात दीड हजार क्विंटल काळ्याबाजारात जाणारे तांदूळ जप्त करण्यात आले; मात्र मक्यासाठी अशी कोणतीही ओळख ग्राह्य धरता येत नाही. मक्याचा बारदाना हा सामान्य असल्यामुळे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा मका ओळखणे अवघड होत असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांतून गव्हाऐवजी आॅगस्ट, सप्टेंबर आणि आॅक्टोबर या तिन महिन्यांच्या कालावधीत गव्हाऐवजी मक्याचे वितरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना मक्याचे नियतन वितरीत करण्यात आले. पासींगही देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी आॅगस्ट महिन्याचे धान्य वाटप पूर्ण झाले आहे. त्याचवेळी काही तालुक्यांमध्ये धान्य वितरण सुरू आहे.

मोफत गव्हाचे वितरण प्रभावित!ंजिल्ह्यातील १३ तालुक्यातील १६ गोदामांमध्ये मक्याची मोठी साठवणूक करण्यात आली आहे. परिणामी, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत मोफत वितरीत केल्या जाणाऱ्या गव्हाची साठवणूक करणे शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खामगाव, देऊळगाव राजा, लोणार, चिखली, मेहकर, मलकापूर आणि नांदुरा येथे मोफत गव्हाचे वितरण प्रभावित झाले आहे. यासंदर्भात गोदाम पालकांनी वाहतूक प्रतिनिधींना गव्हाचे वाटप ‘तात्पुरते बंद’ ठेवण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.रेशनच्या धान्याचाही जिल्ह्यात काळाबाजारजिल्ह्यात रेशनच्या धान्याचाही काळा बाजार होत असल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनच्या काळात असे प्रकार समोर आले आहेत. ग्रामीण भागातून प्रामुख्याने रेशनचे धान्य गोळा केल्या जात असल्याची ओरड आहे. जिल्ह्यात अलिकडील काळात ५१ क्विंटल गहू व ९७३ क्विंटल तांदुळही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, यातील नऊ गुन्हे हे प्रामुख्याने खामगाव-शेगाव तालुक्यातील आहे. जिल्ह्यातएक रॅकेटही सक्रिय असल्याची चर्चा आहे.

तांदळाच्या विक्रीचे ९ गुन्हे दाखल!रेशनच्या तांदळाची काळ्या बाजारात विक्री करताना खामगाव-शेगाव तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक ०९ गुन्हे दाखल झाले आहेत. जवळपास एक हजार क्ंिवटल तांदूळ जप्त करण्यात आला. मात्र, बारदाण्यामुळे मक्याची ओळख पटविणे अशक्य असल्याने काळ्या बाजारात जाणारा मका रोखण्यात पुरवठा विभागाला अपयश येत असल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा