बुलडाणा : शेतातील मक्याच्या उभ्या पिकाला आग लागल्यामुळे अडीच एकरातील मका पीक जळून खाक झाले. शिवाय या आगीत शेतातील इतर साहित्यही आगीत जळाले. ही घटना तालु क्यातील रायपूरनजिकच्या सिंदखेड मार्गावर ८ मे रोजी सकाळी १0 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे सदर शेतकर्याचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील शेख सईद शेख मलंग यांचे सिंदखेड मार्गावर शेत आहे. यात त्यांनी यंदा मका पिक घेतले. आज ८ मे रोजी सकाळी शे.सईद आपल्या शेतातून काम आटोपून घरी परत आले. दरम्यान सकाळी १0 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील मका िपकाला आग लागल्याची माहिती त्यांना फोनद्वारे कळली. माहिती मिळताच शे.सईद शेतात पोहोचले. यावेळी परिसरातील लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पाच एकरपैकी अडीच एकरावरील मका पीक जळून खाक झाले होते. याशिवाय स्प्रिंकलर सेट, मोटर, पाईप जळल्यामुळे शेतकर्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
मका पिकाला आग
By admin | Updated: May 9, 2015 01:53 IST