शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

भरड धान्य म्हणून लाभार्थ्यांच्या माथी ‘मका’ !     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:32 IST

बुलडाणा जिल्ह्यात भरड धान्य म्हणून सरसकट मका वितरणासाठी नियतन देण्यात आले.

 -  अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  गव्हाचे नियतन कमी करून भरड धान्य म्हणून मका जिल्ह्यातील ४३ हजार २७१ विविध कार्ड धारकांच्या माथी मारण्याचे पुरवठा विभागाचे प्रयत्न आहेत. ज्वारी आणि मक्याचे वाटप ज्या प्रमाणात करावयाचे आहे. त्याप्रमाणात गव्हाचे नियतनकमी करण्याचे शासन परिपत्रकात नमूद आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात भरड धान्य म्हणून सरसकट मका वितरणासाठी नियतन देण्यात आले. तसे परमीटही मंजूर करण्यात आल्याने लाभार्थी आणि स्वस्त: धान्य दुकानदारांमध्ये रोष व्यक्त होत आहे.जिल्ह्यात मका खाणाºयांचे प्रमाण नगण्य असून, सार्वजनिक वितरण प्रणालीतंर्गत सरसकट मका वितरणामुळे जिल्ह्यात आगामी काळात उपासमारीचे संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.रब्बी पणन हंगाम २०१९-२० मध्ये खरेदी केलेल्या भरडधान्याचे लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये वाटप करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्देश दिलेत. यासंदर्भात सहसचिव मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने २२ जुलै रोजी एक परिपत्रक जारी केले. यामध्ये ज्वारी व मका खरेदीवर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील खरेदी अधिकारी यांच्याद्वारे नियंत्रण ठेवून अभिकर्ता संस्थामार्फत खरेदी केलेल्या ज्वारी व मका जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याद्वारे गोदामात तात्काळ जमा करून घ्यावा, तसेच प्रमाणपत्र अभिकर्ता संस्थेस द्यावे, तसेच खरेदीची अद्यायावत आकडेवारी तात्काळ शासना सादर करण्याचे निर्देश दिलेत.अभिकर्ता संस्था आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आकडेवारीत तफावत आढळणार नाही, याची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाºयांवर निश्चित करण्यात आली.

त्यामुळेच बुलडाणा जिल्ह्यात खरेदी झालेला मका भरड धान्य म्हणून लाभार्थ्यांच्या माथी मारण्याचे जिल्हा पुरवठा विभागाचे प्रयत्न आहेत. भरड धान्य म्हणून मक्याचे सरसकट वितरण करणे अतिशय चुकीचे आहे. सरसकट मका वितरणामुळे लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका लाभार्थ्यांसोबतच स्वस्त धान्य दुकानदारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.- आ. अ‍ॅड. आकाश फुंडकरजिल्हाध्यक्ष,

भाजपशासकीय परिपत्रकात गव्हाचे नियतन कमी करून मका वाटप करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. परंतू सद्यस्थितीत सरसकट मका वितरणाचे प्रयत्न होत आहे. जिल्ह्यात मका खाणाºयांचे प्रमाण अत्यल्प असल्याने वितरण व्यवस्थेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

- राजेश अंबुसकरजिल्हाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार परवानाधारक संघटना, बुलडाणा.

गव्हाचे नियतन कमी करून  लाभार्थ्यांना सरसकट मका वितरणासाठी  नियतन प्राप्त झाले आहे. वाटप करण्यासाठी परमीटही आले आहे. सरसकट मका वितरणासाठी स्वस्त: धान्य दुकानदारांचा विरोध असून, तशा आशयाचे निवेदनही संघटनेने वरिष्ठ स्तरावर दिले आहे.- व्ही.एम.भगततालुका पुरवठा अधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगाव