शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीमध्ये रिपाइंला हव्यात २0 जागा

By admin | Updated: September 2, 2014 00:42 IST

खा. आठवले : विदर्भात ८ जागा लढणार

बुलडाणा : विधानसभेसाठी ५७ जागांची यादी आम्ही महायुतीकडे दिली आहे. त्यापैकी किमान २0 जागा रिपाइंला मिळाव्यात, असा आमचा आग्रह राहणार आहे. यामध्ये विदर्भातील ८ जागांचा समावेश असल्याची माहिती रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी सोमवारी बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना-भाजपचा तिकीट वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी, आमची यादी आम्ही भाजप-सेनेकडे दिली आहे. लवकरच यावर निर्णय होईल. आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचणे हा आमचा एकमेव उद्देश असल्याने वेळप्रसंगी जागा वाटपासंदर्भात तडजोड करू, असे खा. आठवले यांनी सांगितले. विदर्भातील मेहकर, मोर्शी, उमरखेड, तिवसा, वर्धा, उत्तर नागपूर, भंडारा, अर्जुनी मोरेगाव या आठ जागा रिपाइं लढविणार असल्याचे ते म्हणाले. गत लोकसभा निवडणुकीत रिपाइंचे मतदार मोठय़ा प्रमाणात महायुतीकडे वळल्याचे निकालानंतर दिसून आले. आता शिवसेना-भाजपने त्यांची मते आमच्याकडे वळती करावीत. आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचायचे असेल तर रिपाइंला वगळून ते शक्य होणार नाही, असेही ते म्हणाले. रिपाइंला नेहमीच पडणार्‍या जागा दिल्या जातात, यावेळी असे झाल्यास युती तोडणार का, यावर आठवले म्हणाले की, लोकसभेत आम्ही महायुतीला प्रामाणिकपणे साथ दिली, तरीही आमचा उमेदवार पडला. आता त्यांची वेळ आहे. पडणार्‍या जागा दिल्या, तरी त्या निवडून आणण्यासाठी महायुतीतील सर्वांनीच सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात तसे न झाल्यास युतीबाबत विचार करू, असा इशाराही त्यांनी दिला. स्वतंत्र विदर्भ राज्याची आमची मागणी कायम आहे. देशातील जमिनीचे राष्ट्रीयीकरण करावे, त्यामुळे एकही व्यक्ती भूमिहीन राहणार नाही, तसेच गरिबी कमी करण्यास मदत होईल. विदर्भातील झुडपी जंगलाची जमीन वाटप करावी, त्यासाठी वन कायद्यात बदल करावा, ही मागणी आपण केंद्र सरकारकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आ. अनिल गोंडाणे, सुधाकर तायडे, ब्रम्हानंद चव्हाण, मिलिंद शेळके, बाळासाहेब इंगळे, सुधाकर तायडे तसेच रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, स्वाभिमानीचे रविकांत तुपकर आदी उपस्थित होते.