शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरांविरुद्ध महावितरणच्या आकस्मिक धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणने ठोस पाऊले उचलत जिल्ह्यातील सात शहरांमध्ये एकाचवेळी आकस्मिक कारवाई केली. या मोहिमेमध्ये एकूण ८२ ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये ८३ हजार ४४१ वीजयुनिटची म्हणजे जवळपास ११ लाख रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आले.आरएपीडीआरपी योजनेमध्ये जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील सात शहरांमध्ये ८२ ठिकाणी कारवाईजवळपास ११ लाख रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणने ठोस पाऊले उचलत जिल्ह्यातील सात शहरांमध्ये एकाचवेळी आकस्मिक कारवाई केली. या मोहिमेमध्ये एकूण ८२ ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये ८३ हजार ४४१ वीजयुनिटची म्हणजे जवळपास ११ लाख रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आले.आरएपीडीआरपी योजनेमध्ये जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर व नांदुरा यांचा समावेश आहे, या शहरात दजेर्दार व सर्वोत्तम वीज सेवा देण्यासाठी विविध कामे सुरु आहे. यासोबतच वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. वीज चोरीला अटकाव घालण्यासाठी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या निर्देशानुसार  अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता काकाजी रामटेके, बद्रीनाथ जायभाये, पी एल.हेलोडे, अधिकारी व जनमित्र अशा ३७ पथकामध्ये जवळपास २५१ जणांचा समावेश आहे. यामध्ये  सातही शहरातील  आढळलेल्या एकूण ५८ जणांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुसºया कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्या एकूण २४ जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६  नुसार कारवाई करण्यात आली. संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी जिल्ह्यात नुकत्याच वीजचोरी विरुद्ध झालेल्या  कारवायांमध्ये २०४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून जिल्ह्यातील व शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित आहे. यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत. तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणच्या बुलडाणा मंडळाचे अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांनी केले आहे.