शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे महाशिवरात्री उत्सव रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 12:11 IST

Mahashivaratri celebrations canceled शिवमंदिरात होणारा महाशिवरात्री उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रद्द करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा:  मेहकर तालुक्यातील मोळी येथील शिवमंदिरात होणारा महाशिवरात्री उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रद्द करण्यात आला आहे. मोळी येथे महाशिवरात्रीला शिव-पार्वतीच्या लग्नाची परंपरा अनेक पिढ्यांपासून जपली जाते. या हा कार्यक्रम मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने पार पडणार आहे. यंदा महाप्रसादाची परंपरा खंडित होणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिवमंदिरांमध्ये ११ मार्चला होणारा महाशिवरात्री उत्सवही रद्द करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यातील मोळी येथे कुठलेच निमंत्रण नसतानाही हजारोंच्या संख्येने शिव-पार्वतीच्या लग्नाला वऱ्हाडी मंडळी येतात. शिवचंद्रमोळी येथे आजही महाशिवारात्रीला शिव-पार्वतीचे विधिवत लग्न लावले जाते. देवाच्या या लग्नाचे साक्षीदार होण्यासाठी  भाविकांची १०० पेक्षा अधिक गावांतून शिवमंदिरात एकच गर्दी जमते. मंगलाष्टक म्हणून शिव-पार्वतीचे लग्न लावण्याची ही प्रथा शिवचंद्र मोळीवासी कित्येक वर्षांपासून जपत आहेत. अगदी पारंपरीक पद्धतीने आंतरपाठ व मंगलाष्टकांसह महादेवाचे पार्वतीशी लग्न लावणे हा या सोहळ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. मोळी येथील शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाशिवरात्रीला अखंड हरिनाम सप्ताह, भागवद् कथा वाचन, दररोज कीर्तन, शिवपुराण वाचण्यात येते. परंतु यंदा कोरोनामुळ सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती शिवचंद्र मोळी संस्थानचे अध्यक्ष संदीप नागरिक यांनी दिली. 

शिवपार्वती विवाह होणार साधेपणाने!शिवपार्वतीचा विवाह हा कमी भाविकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने होणार आहे तसेच महाशिवरात्रीला विधिवत पूजन, महाआरतीही अत्यंत कमी भाविकांच्या उपस्थितीतच करण्यात येणार आहे. यावेळी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्देशित सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीbuldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या