शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election Voting Live : आमदारांसह नेते मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:22 IST

जळगाव जामोद: लोकसभेसाठी जळगाव जामोद शहरात गुरूवारी सकाळी पहिल्या एका तासात आमदार डॉ.संजय कुटे यांच्यासह विविध नेतेमंडळींनी मतदानाचा हक्क बजावला.

जळगाव जामोद: लोकसभेसाठी जळगाव जामोद शहरात गुरूवारी सकाळी पहिल्या एका तासात आमदार डॉ.संजय कुटे यांच्यासह विविध नेतेमंडळींनी मतदानाचा हक्क बजावला.आमदार डॉ.संजय कुटे यांनी त्यांचे वडील श्रीरामजी कुटे, आई उमाताई कुटे, पत्नी अपर्णाताई कुट,े जेष्ठ बंधू अभियंता राजेंद्र कुटे, धाकटे बंधू अ‍ॅड.प्रमोद कुटे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. सर्वांनी एकत्रितपणे सकाळी सव्वा आठ वाजता जळगाव जामोद शहरातील मतदान केंद्र क्रमांक ५७ मध्ये जाऊन मतदान केले. आमदार डॉ.संजय कुटे यांचे वडील श्रीरामजी कुटे यांना मतदान केंद्रामध्ये व्हीलचेअर वरून नेण्यात आले. आमदारांव्यतिरिक्त पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी त्यांच्या पत्नी स्मितल पाटील व मुलासह मडाखेड येथे सकाळी पहिल्या तासातच मतदान केले.

मतदानापासून वंचित राहू नका!जळगाव जामोद शहराच्या प्रथम नागरिक सीमा डोबे यांनी त्यांचे पती कैलास डोबे यांच्यासह सकाळी मतदानाचा हक्क बजावला. कोणीही मतदानापासून वंचित न राहता आपला हक्क बजावावा, असे आवाहन नगराध्यक्षा सीमा डोबे यांनी केले.

 पहिले मत माजी आमदारांचे!जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी सकाळी ७ वाजता मतदान केंद्र क्रमांक ६६ वर मतदानाचा हक्क बजवाला. त्यांनी त्या केंद्रावर सर्वात आधी मतदान केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलडाणाDr. Sanjay Kuteडॉ. संजय कुटेJalgaon Jamodजळगाव जामोद