शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महाराणा प्रताप पुतळय़ाची विटंबना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:11 IST

चिखली : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण झालेला व शहरातील अत्यंत गजबजलेल्या डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या अश्‍वारूढ पुतळय़ाच्या हातातील भाला तोडण्याचा व पुतळय़ाचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न अज्ञात समाजकंटकाकडून १0 ऑगस्टच्या रात्री करण्यात आला आहे. हा प्रकार सकाळी ११.३0 च्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पुतळा परिसरात  काहीकाळ तणाव निर्माण झाला होता; मात्र नगरपालिका प्रशासनाने तातडीने वाकविलेला भाला दुरुस्त करून तसेच पुतळय़ाला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देदोषींवर कारवाई न झाल्यास शहर बंदचे आवाहनअज्ञात समाजकंटकाकडून अश्‍वारूढ पुतळय़ाच्या हातातील भाला तोडण्याचा व पुतळय़ाचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण झालेला व शहरातील अत्यंत गजबजलेल्या डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या अश्‍वारूढ पुतळय़ाच्या हातातील भाला तोडण्याचा व पुतळय़ाचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न अज्ञात समाजकंटकाकडून १0 ऑगस्टच्या रात्री करण्यात आला आहे. हा प्रकार सकाळी ११.३0 च्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पुतळा परिसरात  काहीकाळ तणाव निर्माण झाला होता; मात्र नगरपालिका प्रशासनाने तातडीने वाकविलेला भाला दुरुस्त करून तसेच पुतळय़ाला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध नोंदविण्यात आला.स्थानिक डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या ‘ब्रान्झ’ धातूने बनविलेल्या अश्‍वारूढ पुतळय़ाच्या हातातील भाला १0 ऑगस्टच्या रात्री अज्ञात समाजकंटकाने तोडण्याचा प्रयत्न केला, तसेच पुतळय़ाच्या चेहरादेखील विद्रूप करण्याचा प्रयत्न केल्याची बाब ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३0 च्या सुमारास बाळू सुरडकर, o्रीकांत सुरडकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर शहरभरात ही वार्ता वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे  या ठिकाणी मोठय़ा संख्येने नागरिक जमा झाले व परिसरात काहीकाळ  तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या ठिकाणी उपस्थित डॉ. प्रतापसिंग राजपूत, सुभाष राजपूत, ठाणेदार महेंद्र देशमुख, मुख्याधिकारी वसंतराव इंगोले, कुणाल बोंद्रे, शे.अनिस शे.बुढण, जि.प. सदस्य शरद हाडे, न.प. सभापती गोविंद देव्हडे, सुधीर चेके, समाधान गाडेकर, उध्दव थुट्टे, संजय सुराणा यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले, तर पालिका प्रशासनाने तातडीने वाकलेल्या भाल्याची दुरुस्ती करण्यात येऊन पुतळय़ास दुग्धाभिषेक केल्यानंतर उपस्थितांनी हारार्पण करून अभिवादन केले. दरम्यान, राजपूत समाजाच्यावतीने पुतळय़ाची विटंबना करणार्‍या अज्ञात समाजकंटकावर गुन्हा दाखल करून त्यास तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात येऊन या प्रकरणातील दोषींना तातडीने अटक न झाल्यास १४ ऑगस्ट रोजी चिखली बंद पुकारण्याचा इशारा देण्यात आला, तर महाराणा प्रताप यांच्या पुतळय़ाची झालेली विटंबना ही अत्यंत संतापजनक बाब आहे. अशा स्थितीतही समाजबांधवांनी दर्शविलेला संयम कौतुकास्पद असला, तरी या प्रकरणातील दोषींना १३ ऑगस्टपर्यंत अटक न झाल्यास १४ ऑगस्ट रोजी चिखली बंद पुकारण्यात येईल, तसेच पुतळा परिसराच्या अवघ्या १00 मीटर आत दोन्ही रस्त्यांवर दारूचे दुकान असल्याने एखाद्या मद्यपीकडून हे कृत्य झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुतळा परिसरातील दोन्ही रस्त्यांवरील दारूची दुकाने तातडीने हटविण्यात यावी, अशी मागणी यावेळी भाजपाचे डॉ.प्रतापसिंग राजपूत यांनी केली. या घटनेचा भाजपा, शिवसेना, काँग्रेस, शेतकरी संघटना, तालुका पत्रकार संघ यांच्यासह सर्व संघटनांनी तीव्र निषेध नोंदविला असून, आरोपीस तातडीने अटक करण्याची मागणी करीत बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. 

पुतळ्याला विशेष महत्त्वशहराच्या सौंदर्यीकरणात महत्त्वाची भर घालणार्‍या हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्‍वारूढ पुतळय़ाचे अनावरण माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते १७ जुलै २00८ रोजी झाले आहे. हा संपूर्ण पुतळा ‘ब्रान्झ’ धातूमध्ये बनविलेला असून, या पुतळय़ाचे वजन १६ क्विंटल तर महाराणा प्रताप यांच्या हातातील भाला १0 फूट लांबीचा आहे, त्यामुळे या पुतळय़ाला विशेष महत्त्व आहे.