शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव नगरपालिकेत महाविकास आघाडीत फूट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 22:32 IST

Shegoan Nagar Parishad निवडणुकीत भाजपला ब्रेक लावावा निवडणुकीत भाजपला ब्रेक लावावा तरी कसा? असा प्रश्न महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यात काही पालिकांमध्ये महाआघाडी एकसंघ असताना शेगाव नगर पालिकेत महाविकास आघाडीमध्ये फूट पडली. महाविकास आघाडीतील फूट भाजपच्या पथ्थ्यावर पडत असून आगामी निवडणुकीत भाजपला ब्रेक लावावा तरी कसा? असा प्रश्न महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना पडला आहे.शेगाव नगर पालिकेत २२ फेब्रुवारी रोजी नगर पालिका उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या सुषमा शेगोकार विजयी झाल्या. तर महाविकास आघाडीच्या शे. नईम यांना पराभव पत्कारावा लागला. शे. नईम यांच्या पराभवापेक्षा महाआघाडीतील फुटीच्या राजकारणाचीच चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे. २८ सदस्य संख्या असलेल्या शेगाव पालिकेत भाजपचे सर्वाधिक १६ सदस्य आहेत. भाजपला शिवसेनेच्या ०४ पैकी तीन नगरसेवकांची ह्यसाथह्ण लाभली आहे. तर  शिवसेनेचा एक नगरसेवक आघाडीचा धर्म पाळत आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय निश्चित होता. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? असा मुद्दा ऐरणीवर असताना शे. नईम यांची उमेदवारीसाठी मनधरणी करण्यात आली. पक्षनेतृत्वाचा निर्णय राखत नईम निकालाच्या परिणामाची चिंता न करता निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची जोरदार चर्चा आता पालिका वतुर्ळात रंगू लागली आहे. त्याचवेळी दोन सदस्य संख्या असलेल्या एमआयएममधील फुटीचाही मुद्दा या निवडणुकीत ऐरणीवर आला आहे. यामध्ये मो. वसीम पटेल तटस्थ होते. तर एका उमेदवाराने सत्ताधाºयांच्या बाजून उघड-उघड मतदान केले. एकंदरीत शिवसेना आणि एमआयएम मधील फुटी भोवतीच शेगाव पालिकेतील उपाध्यक्षपदाची निवडणूक फिरत असल्याचे आता दिसत आहे.

 भारिपने पाळला आघाडी धर्म!नगर पालिका उपाध्यक्ष निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एक नगरसेविका अनुपस्थित असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचवेळी काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीच्या सोबतीला असलेल्या भारिप बहुजन संघाने आघाडी धमार्चे पालन करीत महाविकास आघाडीला साथ दिली. काँग्रेसच्या-०२, राष्ट्रवादीच्या-०३, भारिप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका अशा सात नगरसेवकांनीच महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले.

टॅग्स :Shegaonशेगावkhamgaonखामगाव