शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

खामगावात लम्पी आजाराची जनावरे फिरताहेत ‘मोकाट’! प्रशासनाची उदासिनता कायम

By अनिल गवई | Updated: September 27, 2022 13:37 IST

Khamgaon News: खामगाव शहर आणि परिसरात लम्पी आजाराची जनावरे फिरत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.  त्यामुळे जनावरांचा कोविड अर्थातच लम्पी  या आजाराबाबत खामगाव येथील पशुसंवर्धन विभाग फारसा गंभीर नसल्याचे दिसून येते.

- अनिल गवई

खामगाव: खामगाव शहर आणि परिसरात लम्पी आजाराची जनावरे फिरत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.  त्यामुळे जनावरांचा कोविड अर्थातच लम्पी  या आजाराबाबत खामगाव येथील पशुसंवर्धन विभाग फारसा गंभीर नसल्याचे दिसून येते. पशुसंवर्धन विभागासोबतच या जनावरांकडे नगर पालिका प्रशासनानेही पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

गत १५ दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात जनावरांच्या लम्पी आजाराने थैमान घातले आहे. बुलडाणा जिल्ह्यातही या आजाराचा वाढता प्रकोप आहे. मात्र, अशाही परिस्थितीत पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लम्पी आजाराला गांभीर्याने घेतले नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. लम्पी आजाराने ग्रस्त जनावरे खामगाव शहर आणि परिसरात चक्क मोकाट फिरताना आढळून येत आहेत. शहरातील शिवाजी नगर, शेगाव नाका, टॉवर चौक, फरशी, रायगड कॉलनी आणि  बसस्थानक यासारख्या गर्दीच्या ठिकाणी लम्पीच्या जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाकडून कोणत्याही प्रकारची दक्षता घेतली जात नसल्याचे दिसून येते. जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण मोठ्याप्रमाणावर झाली आहे, त्याठिकाणी क्वारंटाईन सेंटर (विलगीकरण कक्ष) उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच खामगावात केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे चित्र आहे.

 आयसोलेट करणे दूरच; लसीकरणही रखडले!लम्पी आजाराचा प्रभाव आणखी वाढू नये, यासाठी बाधित जनावरांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवून लम्पीची लागण झालेल्या जनावरांना आयसोलेट करणे गरजेचे आहे. मात्र, खामगावात आयसोलेट करणे दूरच; बाधीत जनावरांचे लसीकरण आणि सर्वेक्षणही रखडले आहे.

लम्पीने बाधित झालेली जनावरे खामगावात मोकाट फिरत असल्याची माहिती मिळाली आहे. अशा जनावरांना वेगळे ठेवण्याच्या तोंडी सूचना नगर पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.-मंगेश खराटे(पशुधन विकास अधिकारी, पशुसंवर्धन विभाग खामगाव) लम्पी आजाराने बाधित जनावरे बुलडाणा आणि खामगावत फिरत असल्याची वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात बुलडाणा नगर पालिकेशी लेखी पत्रव्यवहार केला आहे. मोकाट जनावरांवरील नियंत्रण हा पशुधन विभागाच्या अख्यारीतील विषय नाही. पालिकेने अशी जनावरे क्वारंटीन करावीत.- राजेंद्र पाटीलपशुधन आयुक्त, बुलडाणा.

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगbuldhanaबुलडाणा