शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

लुकमानने केली अपंगत्वावर मात

By admin | Updated: December 3, 2014 01:23 IST

लोकमत शुभवर्त

नाना हिवराळे / खामगावतुम्हाला उडता येत नसेल तर पळा, पळता येत नसेल तर चाला, चालताही येत नसेल तर सांगा; पण सतत हालचाल करा, जेणेकरून दु:खाचे अश्रू पुसून तुमच्या चेहर्‍यावर नेहमी हास्य फुलत राहील. अशाच प्रकारचे हास्य चेहर्‍यावर ठेवून आपण अपंग असल्याची जाणीवही दुसर्‍याला होऊ न देता कठीण परिस्थितीत हसत-खेळत आलेल्या समस्यांना तोंड देऊन अपंग असलेल्या लुकमानने अपंगत्वावर मात करून आदर्श निर्माण केला आहे.खामगाव तालुक्यातील बोथाकाजी येथील हाताचे अपंगत्व असलेला शेख लुकमान (३५) हा युवक ध्येय समोर ठेवून संघर्षमय जीवन जगत आहे. लुकमानचे पाचवीपर्यंंत शिक्षण होऊन घरची परिस्थिती हलाखीची असल्याने वडिलांबरोबर कामावर जाऊ लागला. गावातच लोकांच्या घरी सालाने घरगडी म्हणून तो कामास सुरू झाला. ढोरं वळणे, शेण काढणे तसेच शेतीची सर्व कामे करीत असे. १९९४ मध्ये ज्वारी काढत असताना त्याचा उजवा हात थ्रेशरमध्ये अडकला. सुदैवाने तो बचावला; मात्र यामध्ये उजवा हात दंडापासून वेगळा करावा लागला. यानंतर मात्र अपंग असतानाही पोटाची खळगी भरण्याकरिता नियमितपणे काम केल्याशिवाय पर्याय नाही हे तो ओळखून होता. दुसर्‍याकडे मजुरी न करता स्वत:चा व्यवसाय उभारण्यावर भर दिला. गावातीलच बसथांब्यावर लुकमानने चहा टपरीचे दुकान थाटले. चहासोबत नाश्ताही वाढविला. चहा टपरीच्या व्यवसायाला वर्षभरातच झेरॉक्स मशीनची साथ मिळाली. यामुळे नागरिकांशी संबंध वाढले. गावातही पहिलेच झेरॉक्स सेंटर झाल्याने नागरिकांची झुंबड दुकानावर आली. घरची हलाखीची परिस्थिती असताना इच्छा असूनही अपूर्ण राहिलेले शिक्षण लुकमानने कधी पूर्ण केले याची कुणालाच चाहूल नव्हती. पाचवीनंतर थेट त्याने १७ नंबरचा फार्म भरून दहावीची परीक्षा दिली. तो दहावी पास झाला. यानंतरही त्याची जिद्द पाहण्यासारखी आहे. दहावीनंतर तो बारावीही पास झाला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठची बारावीची गुणपत्रिका अभिमानाने दाखवितो. आता पदवीपर्यंंत शिक्षण पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे.जीवनात एकेक पायरी चढत असताना त्याने सांसारिक जीवनाची सुरुवात केली आहे. पत्नी व तीन मुले असलेला लुकमान संसारात यशस्वीपणे जगत आहे. आई-वडिलांच्या व भावांच्या सहकार्याने आपण व्यवसायाकडे झुकल्याचे तो सांगतो. आपल्या शिक्षणाची वाताहत झाली असली तरी मुलांना मात्र चांगले शिक्षण देण्याची इच्छा लुकमानने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. एका हाताने अपंग असूनही स्वत:च्या जीवनाचा स्तर स्वत:च्या मेहनतीने उंचावणारा लुकमान हा अपंगत्वावर मात करणारे उदाहरण ठरला आहे.