शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गरजू विद्यार्थिनींच्या मदतीसाठी लुधियाना येथील शिक्षिकेचा पुढाकार!

By admin | Updated: September 12, 2016 01:46 IST

हिरकणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरमहा देणार मदत; सोशल मीडिया ठरला महत्त्वाचा दुवा.

चिखली (जि. बुलडाणा), दि. ११ : विविध अभिनव उपक्रमाद्वारे आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती सोशल मीडिया फेसबुकवरून प्राप्त झाल्याने हिरकणी प्रतिष्ठानमार्फत महिला व विद्यार्थ्यांंसाठी राबविण्यात येणार्‍या उपक्रमाने प्रभावित झालेल्या लुधियाना पंजाब येथील मनप्रीत कौर यांनी यात सहभाग नोंदविण्यासह प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील गरजू विद्यार्थिनींना मदत देण्याच्या भावनेने येथून पुढे दर महिन्याला १५00 रुपये मदत देण्याचे जाहीर केले असून त्याबाबत प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष वृषाली बोंद्रे यांच्याशी संपर्कदेखील साधला आहे. हिरकणी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याने घेतलेल्या उत्तुंग भरारीची ही परप्रांतातून मिळालेली पावती प्रतिष्ठानचा उत्साह द्विगुणित करणारी ठरली आहे.हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या होणार्‍या कार्यक्रमाची, कार्याची, सोशल मीडिया फेसबुकवर पोस्ट केल्या जाते. यानुषंगाने हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजला भेट देऊन माहिती जाणून घेतल्यानंतर केवळ लाईक करून न थांबता लुधियानाच्या मनप्रीत कौर प्रतिष्ठानच्या कार्याने प्रेरित होऊन या कार्यात आपल्या परीने मदत व्हावी म्हणून त्यांनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष वृषाली बोंद्रे यांच्याशी संपर्क साधला व समाज कार्यासाठी हिरकणी प्रतिष्ठानला मदत करण्याचे हेतूने दर महिन्याला १५00 रुपये गरीब विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे सांगितले. तसेच हिरकणी प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मदत मनप्रीत कौर यांनी जमादेखील केली आहे. मनप्रीत कौर - लुधियाना येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असून, गोरगरीब विद्यार्थिनींना शिक्षणासाठी येत असलेली अडचणींची त्यांना जाणीव असल्याने स्वत:ची परिस्थिती जेमतेम असतानाही सामाजिक कार्यात योगदान देण्यासह शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत, या उदात्त हेतूने चांगल्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेचा शोध घेत असताना सोशल मीडियावर फेसबुकच्या माध्यमातून हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणची माहिती त्यांना मिळाली. मदत छोटी परंतु मनाचे मोठेपण अथांग, म्हणून ही मदतही हिरकणी प्रतिष्ठानसाठी मोलाची ठरली आहे.