शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मतदार आधार कार्डशी जोडण्याच्या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद

By admin | Updated: April 27, 2015 01:33 IST

बोगस मतदार शोधमोहीम ; राज्यात तीन लाख मतदारांना आधार.

ब्रम्हानंद जाधव / मेहकर (जि. बुलडाणा): बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादीला आधार कार्ड जोडण्याची धडक मोहीम मागील महिन्यापासून हाती घेतली आहे; परंतु आतापर्यंत राज्यातील सुमारे ३ लाख १0 हजार मतदारांनीच आधार लिंकिंग केले आहे. त्यामुळे मतदार यादी आधार कार्डशी जोडण्याच्या या मोहिमेला मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे. राज्यात ८ कोटी ३५ लाख ३४ हजार ८८0 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४ कोटी ४0 लाख ७७ हजार पुरुष, ३ कोटी ९४ लाख ५६ हजार २७१ महिला व १ हजार ३८ इतर मतदारांचा समावेश आहे. राज्यात ८ कोटी ७ हजार लोक १८ वर्षांवरील आहेत. त्यामुळे बनावट मतदार शोधून अचूक मतदार यादी बनविण्याच्या दृष्टिकोनातून मतदार यादीला आधार कार्डाची जोड दिली जात आहे. मतदान कार्ड आणि आधार कार्डमधील माहितीची सांगड घालावी, याबाबत राज्य व केंद्र सरकाच्यावतीने देशभरातील मतदारांची लिंक आधार कार्डशी जोडण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे बोगस मतदार समोर येणार आहेत. मतदारांचे छायाचित्र, मतदार ओळखपत्रातील माहिती व आधार कार्डमधील माहिती यांची सांगड घालणे व ती माहिती प्रमाणित करण्यासाठी मतदरांची लिंक आधार कार्डशी जोडण्याची मोहीम राज्यभर युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. बोगस मतदान कार्डला आळा बसविणे, एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी असलेल्या मतदारांचे अन्य ठिकाणी असलेले नाव वगळणे, मतदार यादीमधील चुका, मतदार ओळखपत्रामधील दुरुस्त्या आदी सुधारणा या लिंकमुळे शक्य होणार आहे. राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार्‍या या मोहिमेला ऑनलाइनची जोड देण्यात आली आहे.